किंग खान शाहरुखचा मन्नत सोशल मीडियावर का होतोय ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh's Mannat Trending on social media

किंग खान शाहरुखचा 'मन्नत' सोशल मीडियावर का होतोय ट्रेंड

तीन दशकांपासून बॉलीवूडमध्ये चाहत्यांच्या आवडत्या अभिनेत्यांमधे शाहरूख आजही वरच्या यादीत.किंग खान म्हणजेच शाहरूख खानचे लाखो करोडो फॅन्स त्याची एक झलक बघण्यासाठी त्याच्या बंगल्या समोर तासनतास उभे असतात.त्यामुळे जेवढा प्रसिद्ध शाहरूख आहे तेवढेच प्रसिद्ध त्याचे राहते घर.त्याच्या घराचे नाव आहे 'मन्नत'.आणि मन्नतमधे काय चाल्लंय ते जाणून घेण्याची उत्सुकता कायमच चाहत्यांना असते.सध्या मन्नत सोशल मीडियावर एखाद्या बॉलीवूड अभिनेत्याप्रमाणे चर्चेत आहे.नेमकं काय कारण आहे याचं त्याचीच चाहत्यांना उत्सुकता.जाणून घेऊया कारण.

शाहरूख खानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटला एक फोटो शेअर केलाय ज्यामुळे मन्नत चर्चेत आले आहे.शाहरूख त्याच्या बंगल्यात वेगवेगळे चेंजेस करतच असतो.आणि त्याबद्दल लगेच सोशल मीडियावर चर्चेला उधाण येतं.अलीकडे त्याने त्याच्या राहत्या घराची म्हणजेच मन्नतची नावाची पाटी बदलली आहे.त्याने घराच्या नावाची जुनी पाटी बदलून एक स्टायलीश पाटी लावली आहे.या पाटीचा फोटो त्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटला टाकलाय.आणि आता हा फोटो सोशल मीडियात ट्रेंड करतोय.

सध्या शाहरूख खान विमल पान मसालाच्या जाहिरातीच्या वादावरूनही फार चर्चेत आहे.त्याने विमल पान मसालाची जाहिरात केली आहे.ज्यामधे शादरूख खानसोबत अक्षय कुमार आणि अजय देवगण हे अभिनेते देखिल आहेत.या जाहिरातीनंतर अक्षयबरोबर शाहरूख आणि अजयलाही ट्रोल केल्या जात आहे.शाहरूख जून २०२२ मधे 'लॉयन' या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे.तसेच या चित्रपटात नयनताराची डेब्युट एन्ट्री असणार आहे.डुंकी,डॉन-३,धूम -४ असे शाहरूखचे बरेच चित्रपट वर्षाच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांना स्क्रिन बघायला मिळणार आहे.

Web Title: Actor King Khan Shahrukhs Home Mannat Trending On Social

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top