आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेचा चमत्कार बघा.. किरण मानेंची जोरदार टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor kiran mane post on high court justice and eknath shinde

आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेचा चमत्कार बघा.. किरण मानेंची जोरदार टीका

गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंड करून मोठे वादळ निर्माण केले आहे. सध्या शिंदे यांच्याकडे ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांपैकी १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं केली होती. या विरोधात आता शिंदे गट ही आक्रमक होत आहे. शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे. यावर अभिनेता किरण माने व्यक्त झाले आहेत.

हेही वाचा: 'सोयीनं कसं जातीवर घेता तुम्ही?' किरण माने संतापले..

अभिनेता किरण माने (kiran mane) हे आता केवळ मराठीच नाही तर अवघ्या मनोरंजन विश्वला ठाऊक असलेले अभिनेते आहेत. त्यांचे 'मुलगी झाली हो' हे 'मालिका' प्रकरण जितके गाजले तितक्याच त्यांच्या पोस्टही व्हायरल होत असतात. सतत नव्या विषयावर अत्यंत धिटाईने ते लिहीत असतात. किंवा केंद्र सरकारला धारेवर धरणारी विधाने करत असतात. आज त्यांनी चक्क न्याय व्यवस्थेवर प्रहार केला आहे. एरव्ही दिरंगाईने चालणारी न्यायव्यवस्था या राजकीय गदारोळात मात्र वेगात काम करते आहे, यावर त्यांनी खोचक टीका केली आहे. (kiran mane facebook post) (actor kiran mane facebook post on court justice and eknath shinde)

kiran mane on eknath shinde and high court

kiran mane on eknath shinde and high court

'काय स्पीड हाय राव ! आपन उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो.आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३० ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून, संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्विकारली आणि उद्या २७ ला सुनावणी ठरवलीसुद्धा ! निक्कालच लावून टाकायचा ना थेट.. जय सुप्रिम कोर्ट.' अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि पर्यायाने न्याय व्यवस्थेचाही समाचार घेतला आहे.

Web Title: Actor Kiran Mane Post On High Court Justice And Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..