actor lokesh gupte shared video about alka kubal make kolambi prawns curry at congratulation movie set london
actor lokesh gupte shared video about alka kubal make kolambi prawns curry at congratulation movie set london sakal

अलका कुबल म्हणजे निव्वळ नाद, लंडनमध्ये केलं झणझणीत कोळंबीचं कालवण..

अभिनेत्री अलका कुबल अभिनयापलीकडे माणूस म्हणून किती समृद्ध आहेत त्याचं दर्शन या विडिओत घडतं.

alka kubal making prawns : अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहे. मग ती 'आई माझी काळूबाई' मालिका असो किंवा 'धुरळा' सारखा दर्जेदार चित्रपट. अलका ताईंनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे. अलका कुबल म्हणजे रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तर चाहताव वर्ग कमी झालेला नाही. विशेष म्हणजे त्या प्रसिद्धीच्या वलयात असल्या तरी त्यांनी साधेपणा सोडलेला नाही. सध्या त्या लंडन मध्ये चित्रीकरणासाठी गेलेल्या असताना त्यांनी सर्वांसाठी खास कोळंबीचा बेत केला आहे. अलका ताईंच्या या साधेपणविषयी दिग्दर्शक आणि निर्माता लोकेश गुप्ते याने एक खास पोस्ट केली आहे.

(actor lokesh gupte shared video about alka kubal making kolambi prawns curry at congratulation movie set london)

actor lokesh gupte shared video about alka kubal make kolambi prawns curry at congratulation movie set london
'मन उडू उडू झालं' मालिका घेणार निरोप.. असा होणार शेवट..

गेली काही वर्ष अलका कुबल (alka kubal) नव्या जोमाने कामाला लागलेल्या आहेत. 'वेडींगचा शिनेमा','धुराळा' यांसारखे नावीन्यपूर्ण चित्रपट तर 'आई माझी काळूबाई' सारखी मालिका त्यांनी केली. सध्या त्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. सध्या त्या लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'congratulations' या आगामी सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून लंडनमध्ये या सिनेमाचं शुटींग सुरू आहे. याच चित्रीकरणादरम्यान अलका कुबल यांचा साधेपणा आणि उत्तम गृहिणी असणं दिसून आलं आहे. एक विडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अलका ताई लंडन मध्ये कोळंबीचं कळवण करताना दिसत आहेत.

(lokesh gupte upcoming congratulation movie) (alka kubal makeing kolambi)

दिग्दर्शक लोकेश गुप्तेनं अलका ताईंचा व्हिडीओ शेअर केला आहे. लंडनमध्ये शुटींग संपल्यानंतर अलका ताईंनी स्वत: च्या हातानं कोळंबी कालवण बसून सगळ्या टीमला खाऊ घातलं. या विडिओ सोबत लोकेशने एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. तो म्हणतो, 'काल शूटिंग थोडे लवकर संपल्यावर एखादिनी आराम केला असता रूम वर जाऊन. पण छे... मार्केटमध्ये जाऊन कोळंबी आणून ती रूमवर साफ करुन आज सगळ्यांना स्वतःच्या हातचे कालवण खाऊ घातले. अलका ताई तुस्सी ग्रेट हो. दीड महिन्यांनी घरचे जेवण जेवल्याचं समाधान मिळाले'. लंडनमध्ये सुरू असलेल्या congratulations या चित्रपटात अलका कुबल, सिद्धार्थ चांदेकर, पुजा सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता लोकेश गुप्ते सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com