esakal | अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

Actor Bikramjeet Kanwarpal

अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

माजी सैन्य अधिकारी आणि अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन झाले. 'डॉन', 'मर्डर २', 'क्रिएचर', 'पेज ३', 'आरक्षण' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बिक्रमजीत हे सैन्यात कार्यरत होते. २००२ साली ते मेजरच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अभिनयविश्वात पाऊल ठेवलं. चित्रपटांसोबतच त्यांनी मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केलं.

कंवरपाल यांचा हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ कंवरपाल हेसुद्धा सैन्य अधिकारी होते. १९८९ साली बिक्रमजीत यांनी सैन्यात प्रवेश केला आणि २००२ पर्यंत ते कार्यरत होते. अभिनयाची त्यांना बालपणापासून फार आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर चित्रपटांत काम करायला सुरुवात केली.

कंवरपाल यांनी '२४', 'क्राईम पेट्रोल दस्तक', 'अदालत', 'दिया और बाती हम', 'सियासत', 'ये है चाहतें', 'स्पेशल ओपीएस' यांसारख्या मालिका आणि वेब सीरिजमध्येही दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.