दिग्‍गज अभिनेता मकरंद देशपांडे साकारणार वेताळाची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

रुपेरी पडदा असो वा मंच, मकरंद देशपांडेने प्रेक्षकांचे अस्‍सल मनोरंजन केले आहे. हा प्रतिभावान अभिनेता दीर्घकाळानंतर &TV वरील आगामी काल्‍पनिक मालिका 'विक्रम बेताल की रहस्‍यगाथा'च्‍या माध्‍यमातून टेलिव्हिजनवर दिसणार आहे.

अभिनेता, नाटककार व दिग्‍दर्शक मकरंद देशपांडे सर्व गोष्‍टींमध्‍ये निपुण आहे आणि त्यांनी या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. काहीसे वैचित्र्यपूर्ण पण विलक्षण व उत्‍साही व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि त्याला साजेशा भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या या अभिनेत्‍याने 'जंगल', 'सरफरोश', 'स्‍वदेस', 'मकडी' आणि 'डरना जरुरी है' अशा हिंदी चित्रपटांमधून भारतीय प्रेक्षकांसमोर प्रभावी भूमिका सादर केल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक प्रसिद्ध नाटकंही आहेत. म्‍हणूनच हा अभिनेता भारतीय रंगभूमीवरील एक रत्न मानला जातो. रुपेरी पडदा असो वा मंच, मकरंद देशपांडेने प्रेक्षकांचे अस्‍सल मनोरंजन केले आहे. हा प्रतिभावान अभिनेता दीर्घकाळानंतर &TV वरील आगामी काल्‍पनिक मालिका 'विक्रम बेताल की रहस्‍यगाथा'च्‍या माध्‍यमातून टेलिव्हिजनवर दिसणार आहे. मकरंद चुतर वेताळाची भूमिका साकारताना दिसणार आहेत आणि ते या भूमिकेमध्‍ये आपली स्‍वत:ची कलात्‍मक व विलक्षण स्‍टाइलची भर करणार आहेत.

जवळपास २,५०० वर्षांपूर्वी महाकवी सोमदेव भट्टाने लिहिलेल्‍या पारंपरिक कथांना या मालिकेत समकालीन रुप दिले जाणार आहे. विष्‍णूगुप्‍तचा प्रवित्र आत्‍मा असलेला बेताल कोणत्‍याही स्थितीत मानवजातीला मदत करू इच्छितो. राजा विक्रमादित्‍य जेव्‍हाजेव्‍हा बेतालला पकडण्‍यासाठी येतो तेव्‍हातेव्‍हा बेताल राजाला कोड्यासह शेवट होणा-या कथा सांगत त्‍याच्‍या हेतूमध्‍ये बदल करायला भाग पाडतो. प्रत्‍येक कथेच्‍या शेवटी बेताल एक प्रश्‍न विचारतो, ज्‍यामुळे राजा विक्रम अनपेक्षित दुविधेमध्‍ये सापडून जातो. या कथा आधुनिक रुपामध्‍ये सादर करण्‍यात येतील आणि आजच्‍या काळात आपल्‍याला भेडसावत असलेल्‍या आव्‍हानांचे निराकरण करण्‍याचे मार्ग सांगतील. या महान कलाकृतीमागील क्रिएटिव्‍ह हात असणार आहेत अलिंद श्रीवास्‍तव व निस्‍सार परवेझ नेतृत्वित पेनिन्‍सुला पिक्‍सर्च आणि मालिकेचे लेखक व क्रिएटिव्‍ह निर्माता सी. एल. सैनी.

बेतालची भूमिका साकारण्‍याबाबत बोलताना मकरंद देशपांडे म्‍हणाले, 'बालपणी मला विक्रम व वेताळ यांच्‍या रोमांचक कथा खूप आवडायच्‍या. त्‍यावेळी मला वेताळाची खूप भिती वाटायची. पण, त्याचवेळी मला त्यातील हा वेगळेपणाही भावला होता. लहानपणी ज्याची भीती वाटायची तेच पात्र आता साकारायला मिळणं हे कोणत्‍याही कलाकारासाठी एक मोठा बदल असण्‍यासोबतच स्‍वप्‍नवत भूमिका आहे. मला आनंद होत आहे की मी अशा लक्षणीय भूमिकेसह अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परतत आहे. मालिकेचे लेखक सैनी यांच्यासोबत चर्चा करताना मी वेताळाच्‍या गतायुष्‍याची एक कथा ऐकली. मला ही कथा माहीतच नव्‍हती आणि ही कथा ऐकून या भूमिकेला अधिक जिवंत रूप देण्‍याची उत्‍कंठा माझ्यामध्‍ये निर्माण झाली. मालिकेमध्‍ये व्‍हीएफएक्‍सच्‍या दर्जासह अनोख्‍या कथा सांगितल्‍या जाणार आहेत. मला वाटते ही मालिका उत्‍तम आहे. ही मालिका आजच्‍या पिढीला आधुनिक तंत्रांचा वापर करत नाट्यमय व आकर्षक पद्धतीने दिग्‍गज कथांबाबत जाणून घेण्‍याची संधी देणार आहे. मी या मालिकेसाठी शूटिंग सुरू करण्‍याची आणि &TV वर ही मालिका सादर होण्‍याची अधिक काळ वाट पाहू शकत नाही.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Makrand Deshpande will play the role of Vital in Vikram Betal Ki Rahasyagatha