
mangesh desai : 'धर्मवीर' चित्रपटाचे निर्माते, अभिनेता मंगेश देसाई यांच्या कारला सोमवारी अपघात झाला होता. तो कर्जतला जात असताना सायन-पनवेल महामार्गावर कोकण भवन नजीक ही दुर्घटना घडली. मंगेश देसाई (Mangesh Desai) कुटुंबासोबत यावेळी कर्जतला जात होता. त्याच्या कार अपघाताची बातमी येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या गाडीचा अपघात झाल्याने गाडीचे नुकसान झाले पण कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे मंगेश देसाई यांनी पोस्ट शेयर करत सर्वांचे आभार मानले आहे.
(actor mangesh desai shared post to say thanks to all after car accident nsa95)
मंगेश देसाई यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. 'अपघातामध्ये फक्त गाडीचे नुकसान झाले आहे. ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. काळजी नसावी. धन्यवाद!' असे मंगेश देसाई यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. (mangesh desai car accident) (mangesh desai post after accident)
मंगेश देसाई हे आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात असताना समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने देसाई यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. सायन-पनवेल महामार्गावरील बेलापुर येथील कोकण भवन या ठिकाणी हा अपघात झाला. या नंतर प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. यानंतर 'तुमच्या सर्वांच्या सदिच्छा असताना, गणपती बाप्पा माझ्यासोबत असताना मला काहीही होऊ शकत नाही. मी सुखरुप आहे. छोटासा अपघात झाला होता. गाडी थोडी खराब झाली. मला तसेच माझ्या कुटुंबियांना काहीही दुखापत झालेली नाही. मला भरपूर फोन कॉल्स आले. काळजी करण्यासारखे काही नाही,' अशी माहिती एका व्हिडीओद्वारे मंगेश देसाई यांनी माध्यमांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.