बॉलीवूडमध्ये कोरोना; मनोज वाजपेयी पॉझिव्टिव्ह 

actor manoj bajpayee has tested positive for covid19 self quarantine at his home
actor manoj bajpayee has tested positive for covid19 self quarantine at his home
Updated on

मुंबई - बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसुन आले आहे. यापूर्वी काही कलाकारांनी आपल्याला कोरोना झाला असून आपण घरी क्वॉरानंटाईन होणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी प्रख्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर यांना कोरोना झाल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर आता प्रख्यात अभिनेता मनोज वाजपेयीलाही कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. एनआयनं ही माहीती व्टिटव्दारे सांगितली आहे. बॉलीवूडमध्ये सध्या कोरोनाचा प्रसार वाढत चालल्यानं मोठं संकट उभे राहिले आहे.

मनोजला ज्यावेळी कोरोना झाल्याचे कळले तेव्हा त्यानं स्वतला क्वॉरानंटाईन करुन घेतलं आहे. असे सांगितले जात आहे की, मनोज हा एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी बाहेर होता त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली. जेव्हा त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यात आले  आहे. मनोजनं पूर्ण सावधगिरी बाळगली आहे. तसेच त्यानं चाहत्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. 

मनोज वाजपेयीची फॅमिली मॅन 2 ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना गेल्या वर्षभरापासून या मालिकेच्या दुस-या भागाचे वेध लागले आहेत. ती दरवेळी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पुढे ढकलली जात आहे. त्या मालिकेच्या दुस-या सीझनचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. दुसरीकडे त्याच्या Despatch नावाच्या चित्रपटाची शुटिंगही सुरु आहे. तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 
 यापूर्वी रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिव्टिव्ह आला आहे. त्यामुळे भन्साळी यांना गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचे शुटिंग थांबवावे लागले आहे.

दुसरीकडे रणबीरची ब्रम्हास्त्रचे शुटिंगही बंद आहे. रणबीरच्या आईनं त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्याचा एक फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. तिनं लिहिलं होतं. आपण माझी जी काळजी करता आहात त्याबद्दल धन्यवाद. माझी कोरोनाची टेस्ट पॉझिव्टिव्ह आली असून मी योग्य ती काळजी घेत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com