'धर्मवीर'साठी प्रसाद ओकला 'माझा' पुरस्कार! म्हणाला, एका सच्च्या माणसाची.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor prasad oak got ashok mulye maza purskar award for anand dighe role in dharmveer movie

'धर्मवीर'साठी प्रसाद ओकला 'माझा' पुरस्कार! म्हणाला, एका सच्च्या माणसाची..

prasad oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. या दोन्ही चित्रपटांचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. विशेष म्हणजे प्रसादने 'धर्मवीर' चित्रपटात साकारलेल्या 'आनंद दिघे' यांच्या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुक होत आहे. आतापर्यंत त्याला या भूमिकेसाठी तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे काही महीने होऊन गेले असतानाच पुरस्कारांवर हा चित्रपट आपले नाव कोरत असल्याने प्रसादने वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नुकतीच त्याने 'माझा पुरस्कारा'नंतर एक पोस्ट शेयर केली आहे.

(actor prasad oak got ashok mulye maza purskar award for anand dighe role in dharmveer movie)

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटात उलगाडण्यात आला होता. आनंद दिघे यांचे नाव महाराष्ट्रात खूपच मोठे असल्याने ही भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेष म्हणजे प्रसाद ओकने ही भूमिका इतकी लीलया पेलली की प्रेक्षक भारावून गेले. प्रसादच्या अभिनयासाठी त्याचे खूपच कौतुक झाले. हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं होतं. आता पर्यंत या चित्रपटासाठी प्रसादला तीन पुरस्कार मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्रसादला 'लोकशाहीर दादा कोंडके' यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर 'फक्त मराठी सन्मान' हा पुरस्कार देखील त्याला प्राप्त झाला. आता प्रसादला 'धर्मवीर' मधील भूमिकेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या 'माझा पुरस्काराने'सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसाद म्हणतो, 'धर्मवीर'चा तिसरा पुरस्कार "माझा पुरस्कार".. एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं कौतुक एका सच्च्या माणसाकडून...!!! धन्यवाद मुळये काका... धन्यवाद टीम धर्मवीर...'' अशा शब्दात त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Marathi Moviesprasad oak