Prathamesh Parab: ठरलं तर! या तारखेला होणार प्रथमेशचा साखरपुडा, गर्लफ्रेंडची भन्नाट पोस्ट व्हायरल

प्रथमेश परबच्या साखरपुड्याची तारीख त्याच्या गर्लफ्रेंडने सांगितली आहे
actor prathamesh parab engagement date revealed with girlfriend kshitija ghosalkar
actor prathamesh parab engagement date revealed with girlfriend kshitija ghosalkar SAKAL
Updated on

Prathamesh Parab Engagement News: टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर सक्रीय असतो. काही दिवसांपुर्वी प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर यांनी नात्याची जाहीर कबुली दिली आणि लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं.

अशातच नुकतंच प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितीजाने सोशल मीडियावर खास पोस्ट करुन ते दोघे साखरपुडा कधी करणार? याची तारीख जाहीर केलीय.

(actor prathamesh parab engagement date revealed with girlfriend kshitija ghosalkar)

actor prathamesh parab engagement date revealed with girlfriend kshitija ghosalkar
Ira Khan - Nupur Shikhare Reception: आयराच्या रिसेप्शनला शाहरुख-आमिर-सलमान एकत्र, व्हिडीओ व्हायरल

प्रथमेशच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर तिचे प्रथमेशसोबतचे फोटो पोस्ट केलेत. याखाली तिने कॅप्शन दिलंय. क्षितीजा लिहीते,

"14.2.2024 Valentine's Day चं आमच्या relationship मध्ये special स्थान आहे.🥹🩷
म्हणजे individually आम्ही Valentine's day वगैरे या concept वर कधी फार believe नाही करायचो, नेहमी च्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात."

क्षितीजा पुढे लिहीते, "14 फेब्रुवारी 2020- माझी Valentine's Day special photoshoot series बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. 14 फेब्रुवारी 2021- We had started our relationship.. 14 फेब्रुवारी 2022- Completed 1 year with so many memories
14 फेब्रुवारी 2023- आमच्या relationship बद्दल social media वर officially announced केलं."

क्षितीजा शेवटी लिहीते, "14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या relationship ला 3 वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी special केलंच पाहिजे ना!! म्हणून...
14 फेब्रुवारी 2024 ला आम्ही engagement करायचं ठरवलंय.
Here's प्रतिजा all set to the next chapter of our love story.🫶🥹❤️🥳
PS- लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं का!"

अशाप्रकारे प्रथमेश - क्षितीजा १४ फेब्रुवारीला साखरपुडा करणार आहेत. या दोघांच्या साखरपुड्याची सर्वांना उत्सुकता असून सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com