esakal | अभिनेता राजकुमार राव तेलगूच्या रिमेकमध्ये; वाचा कोणता चित्रपट आहे तर...
sakal

बोलून बातमी शोधा

rajkummar-rao

ही एक अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे. या चित्रपटाची कथा  एका पोलिस ऑफिसरभोवती फिरणारी आहे. अचानक एके दिवशी एक महिला गायब होते. मग साहजिकच तिचा शोध हा पोलिस अधिकारी कसा करतो याची कहाणी आहे.

अभिनेता राजकुमार राव तेलगूच्या रिमेकमध्ये; वाचा कोणता चित्रपट आहे तर...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : दक्षिणेतील एखाद्या सुपरहिट चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक बनणे ही बाब तशी काही नवीन राहिलेली नाही. आतापर्यंत कित्येक यशस्वी चित्रपट हिंदीत आले आणि यशस्वी ठरले. हिंदीतीलही काही लोकप्रिय चित्रपटांचे दक्षिणेत रिमेक झाली आहे. दक्षिण चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांची देवाणघेवाणे सुरूच आहे आणि ती राहणार आहे. 

धूमकेतूचे दर्शन होईल का?  खगोलप्रेमींना लागली आहे आस...वाचा सविस्तर

आता तेलगू हिट होमीसाईड इंटरवेन्शन टीम या चित्रपटाचा रिमेक हिंदीत येणार आहे. त्यामध्ये अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. शैलेश करणार आहेत. तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. 

मद्यविक्रेते म्हणतायत, "नाहीतर आमचंही शटर होईल कायमचं डाऊन", असं झालं तर तळीरामांची चिंताही वाढेल

ही एक अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे. या चित्रपटाची कथा  एका पोलिस ऑफिसरभोवती फिरणारी आहे. अचानक एके दिवशी एक महिला गायब होते. मग साहजिकच तिचा शोध हा पोलिस अधिकारी कसा करतो याची कहाणी आहे. राजकुमार राव सांगतो, की मला या चित्रपटाच्या कथानकाने खूप भुरळ घातली आहे आणि म्हणूनच मी हा चित्रपट स्वीकारला आहे. 
---
संपादन :  ऋषिराज तायडे

loading image