Rajkummar Rao: 'तु प्लास्टिक सर्जरी केली आहे का?', ट्रोल्सच्या प्रश्नावर राजकुमार रावने दिली ही धक्कादायक प्रतिक्रिया

आपल्या दमदार अभिनयामुळे राजकुमार रावने इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
rajkummar rao
rajkummar raoSakal

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर त्यात राजकुमार रावचं नाव नक्कीच सामील होईल. आपल्या दमदार अभिनयामुळे राजकुमार रावने इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर चाहते राजकुमारच्या अभिनयाचे खूप कौतुक करतात.

दुसरीकडे, राजकुमार रावला प्लास्टिक सर्जरीसारख्या अनेक मुद्द्यांवरून खूप ट्रोल केले जाते. दरम्यान, राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? याप्रकरणी 'भिड' अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.

सध्या राजकुमार राव त्याच्या 'भिड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, राजकुमार रावने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली आहे. यादरम्यान सिद्धार्थने राजकुमार रावला तुम्ही कधी प्लास्टिक सर्जरी केली आहे का असा प्रश्न विचारला आहे. यावर राजकुमार रावने 'नाही भाऊ, प्लास्टिक सर्जरी नाही केली' असे सडेतोड उत्तर दिले. यानंतर सिद्धार्थ कन्ननने राजकुमार रावला विचारले की, जेव्हा तुम्ही अशा बातम्या किंवा अफवा वाचता तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते.

rajkummar rao
Deepika Padukone Parents: बापरे! दिपिकाचे आई-वडिल नात्याने लागतात भाऊ-बहिण

राजकुमार राव म्हणाला- 'काही नाही फक्त अशा अफवा वाचून चेहऱ्यावर हसू येते. लोक माझ्याबद्दल बोलत आहेत हे चांगले वाटते. अशाप्रकारे राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरीच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

राजकुमार राव स्टारर चित्रपट 'भिड' 24 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. राजकुमार रावचा हा चित्रपट कोरोनाच्या काळात देशात लॉकडाऊनची कहाणी दाखवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा यांनी केले आहे.

राजकुमार राव व्यतिरिक्त बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर, अभिनेता पंकज कपूर 'भिड'मध्ये मुख्य भूमिकेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com