Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 बाबत रणबीर कपूरने दिली मोठी अपडेट.. सांगितल्या शूटिंगच्या तारखा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor ranbir kapoor confirms brahmastra 2 movie shooting will start from 2023 year end

Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 बाबत रणबीर कपूरने दिली मोठी अपडेट.. सांगितल्या शूटिंगच्या तारखा..

Brahmastra 2 : रणबीर कपूर आणि आलिया भट या जोडगोळीचा प्रचंड चर्चा झालेला चित्रपट म्हणजे 'ब्रह्मात्र'. लॉकडाउन पासून खरंतर या चित्रपटाची चर्चा होती. पण गेल्यावर्षी हा 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.

दरम्यान आलिया रणबीर एकत्र आल्याने त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायलाही प्रेक्षकांना खूप मजा आली, या शिवाय या चित्रपटातील VFX, डायलॉग्स याचेही बरेच कौतुक झाले. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

(actor ranbir kapoor confirms brahmastra 2 movie shooting will start from 2023 year end)

'ब्रह्मास्त्र-2' हा चित्रपट कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या विषयी वारंवार रणबीर आणि आलियाला विचारले जात आहे. त्यामुळे रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मोठी उपडेट दिली.

एका मुलाखतीमध्ये रणबीरला चित्रपटाची संहिता आणि चित्रीकरण सुरू झालंय का याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी रणबीर म्हणाला, 'ब्रह्मास्त्र-2 च्या स्क्रिप्टचं लिखाण सध्या अयान मुखर्जी करत आहे. 2023 च्या शेवटी किंवा 2024 च्या सुरुवातीला या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याचा प्लॅन अयान करत आहे.'

रणबीरच्या या उत्तरानं चाहत्यांची उत्सुकता अधिकच शिगेला गेली असून आता पासूनच चित्रपटाची हवा सुरू झाली आहे.

 ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत होते. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनीही या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. ब्रम्हास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले होते. आता दुसऱ्या भागात कोणते कलाकार दिसणार याची चर्चा होऊ लागली आहे.