महामानवाची भूमिका साकारणा-या अभिनेता सागर देशमुखचं लोकांना आवाहन..जयंतीनिमित्त 'घरीच थांबून भीमापुढे नतमस्तक होऊ'

sagar
sagar

मुंबई- सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे..साधारणतः दरवर्षी लोक सणावारांच्या दिवशी घराबाहेर पडून सण साजरे करताना दिसतात..मात्र यंदा सगळ्याच सणांवर कोरोनाचं सावट दिसून येतंय..गुढीपाडवा, होळी यांसारखे सण रस्त्यावर येऊन साजरे न करण्याचं आवाहन केल्यानंतर आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरीच जयंती साजरी करण्याचं आवाहन अनेकजण करताना दिसत आहेत..छोट्या पडद्यावर बाबासाहेबांची भूमिका साकारणा-या सागर देशमुखने देखील घरातंच राहण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन बाबासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी एक आवाहन केलं आहे. दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र यंदा तसं न करता आपण घरीच राहून बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करावे असं आवाहन सागर देशमुख आणि आदर्श शिंदे यांनी केलं आहे.

१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सकाळी ११ वाजता स्टार प्रवाहवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. सध्याच्या वातावरणात हा विशेष भाग प्रेक्षकांना नक्कीच नवचेतना देईल. तेव्हा आपल्या संरक्षणासाठी घरातून बाहेर न पडता या विशेष भागाचा आनंद लुटुया आणि सरकारी सुचनांचं पालन करुन कोरोनावर मात करुया अशी भावना सागर देशमुखने व्यक्त केली.

तर अभिनेता सिद्धार्थ जाधवने, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन करुन लोकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे..आजुबाजुची परिस्थिती पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गर्दी करु नका..घरच्या घरीच बाबासाहेबांची जयंती साजरी करा..हीच त्यांच्यासाठी मानवंदना ठरेल असं म्हटलंय..

actor sagar deshmukh appeal people to celebrate dr babasaheb aambedkars jayanti at home only  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com