Film Shooting:'कभी ईद कभी दिवाली..' सलमान भाईचा लूक वायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan's First Look Photo viral on social media

'कभी ईद कभी दिवाली..' सलमान भाईचा लूक वायरल..

सलमान खानच्या चित्रपटाची कमाई बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड ब्रेक करणारी असते अशी बॉलीवूडमधे सलमानची प्रचिती आहे.अभिनेता सलमानने त्याच्या पुढच्या चित्रपटाला सुरूवात केली असून त्याचा चित्रपटातील 'फर्स्ट लूक फोटो' त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.चित्रपटाचे नाव जरी सलमानने उघड केले नसले तरी चाहत्यांना खात्री आहे की सलमान आता 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटावर काम करतोय.

'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून यात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.चित्रपटाचे नाव उघड न करता सलमानने 'नव्या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात झाली' असे कॅप्शन दिले आहे.(Salman Khan)काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या सलमानच्या येणाऱ्या चित्रपटातील फर्स्ट लूकचा फोटो चांगलाच चर्चेत आलाय.हा फोटो सलमानने त्याच्या इन्स्टाग्रान अकाऊंटला पोस्ट केलाय.(Instagram)या फोटोमधे सलमान काळ्या रंगाच्या टिशर्टवर काळया रंगाचे जॅकेट घालून दिसतोय.काळा गॉगल,हातात सिल्वर ब्रॅसलेट घालून सलमान भाईच्या हातात भला मोठा रॉड दिसतोय.सलमानच्या पोस्टला कमी वेळातच चाहत्यांच्या दिलखुलास प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सलमानच्या पोस्टला एकाने 'सलमान भाई बेस्ट आहेत',दुसऱ्याने 'आम्ही खूप उत्सुक आहोत भाईजान' तर तीसऱ्याने त्यापेक्षाही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.त्याने 'सलमान भाई आग है इनके सामने सब राख है' अशी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.(Bollywood) काही दिवसांपूर्वी पूजा हेगडेनेही स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि 'कभी ईद कभी दिवाळी'चे शूट सुरू केल्याची घोषणा केली होती.(Pooja Hegde)फोटोमध्ये तिने सलमान खानचे सिग्नेचर ब्रेसलेट घातलेले दिसते.

'कभी ईद कभी दिवाली' हा २०२२ मधे रिलीज होणारा सलमानचा एकमेव चित्रपट असणार आहे.त्यामुळेही चाहत्यांना सलमानची पोस्ट बघताच सलमानने याच चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केल्याचा विश्वास आहे.हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Actor Salman Khan Posted His First Look Photo From Shooting Of Kabhi Eid Kabhi Diwali

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top