कटाप्पाने का केला शेअर केला शाहरुख बरोबरचा फोटो; नेमकं कारण काय ?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 3 October 2020

सत्यराज या नावाने रुपेरी पडद्यावर काम करणारे कटप्पा यांचे मूळ नाव रंगराज सुबैया असे आहे. त्यांनी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याच्यासोबत देखील काम केले आहे. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत काम केले आहे.

मुंबई - बाहूबली या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वाच्या कौतुकास पात्र झालेले कटाप्पा यांनी शाहरुख बरोबर आपला एक फोटो शेयर केला आहे. त्याला निमित्त देखील तसेच आहे. “कटप्पा ने बाहुबली को क्युँ मारा”, याबरोबरच “कटप्पा ने शाहरुख सोबत आपला फोटो का शेयर केला याचे खरे कारण वेगळेच आहे.

सत्यराज यांनी रुपेरी पडद्यावर शाहरुखच्या सासरेबुवांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट त्यावेळी हिट झाला होता. पण, या चित्रपटाने सत्यराज यांनी प्रसिद्धी मिळाली नाही. ‘बाहुबली’तील कटप्पाच्या भूमिकेने त्यांना देशभरातच नाही तर देशाबाहेरही प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटाने कमाईचा एक नवा रेकॉर्ड रचला. हा चित्रपट प्रत्येक बाजूने विशेष राहिला.

‘बाहुबली’ चित्रपटातील अभिनेता सत्यराज यांनी बाहुबली चित्रपटात कटप्पा ही भूमिका साकारली आहे. आज त्याच कटप्पाचा म्हणजे सत्यराज यांचा वाढदिवस आहे. त्यांनी बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे, हे फार कमी जणांना माहित आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी शाहरुख सोबतचा फोटो शेयर केला आहे.

सत्यराज या नावाने रुपेरी पडद्यावर काम करणारे कटप्पा यांचे मूळ नाव रंगराज सुबैया असे आहे. त्यांनी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याच्यासोबत देखील काम केले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी दुर्गेश्वर म्हणजेच दीपिका पदुकोणच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यात त्यांनी एका मोठ्या डॉनची व्यक्तिरेखा साकारली होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Satyaraj Aka Katappa Played Shahrukh Khans Father In Law Character In Chennai Express Ssj 93