'हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं', शरद पोंक्षे यांचे एकनाथ शिंदेंना पुन्हा समर्थन..

अभिनेते शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
actor sharad ponkshe shared  post for maharashtra new cm eknath shinde at sawarkar smarak dadar
actor sharad ponkshe shared post for maharashtra new cm eknath shinde at sawarkar smarak dadar sakal

अभिनेते शरद पोंक्षे समाज माध्यमांवर सक्रिय असून अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करत असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय विधानांमुळे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारी एक पोस्ट लिहिली. त्यावरून बराच वादही झाला. त्यांनतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरही पोंक्षे यांनी कौतुकाचा वर्षाव केला. आता पुन्हा एकदा त्यांनी एक पोस्ट लिहून शिंदे यांचे कौतुक केले आहे.

(actor sharad ponkshe shared post for maharashtra new cm eknath shinde at sawarkar smarak dadar nsa95)

actor sharad ponkshe shared  post for maharashtra new cm eknath shinde at sawarkar smarak dadar
नवरा म्हणून कसा आहे रणवीर सिंग, दीपिकाला देतो का इंटीमेट सीनसाठी परवानगी?

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी भेट दिली. मंगळवारी (५ जुलै) रोजी त्यांनी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. तसेच सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन ते शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी सावरकरांना अभिवादन केले. भर पावसात त्यांनी हा दौरा केल्याने एकनाथ शिंदेंचे कौतुकही झाले. पाऊस सुरु असतानाच शिंदे सावरकरांना वंदन करण्यात असल्याता फोटो समोर आला. हा फोटो पाहून अभिनेते शरद पोंक्षे (sharad ponkshe) यांनी एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असल्याचा फोटो सोशल मिडीयावर शेअर करत एक पोस्ट लिहीली आहे. 'मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे.' असे शरद पोंक्षे यांनी म्हंटले आहे. गेले काही दिवसते सातत्त्याने शिंदे यांचे कौतुक करत आहेत.पोंक्षे यांच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान शिंदे यांनी मदत केली होती, त्याबद्दल एक पोस्ट लिहून शरद पोंक्षे यांनी आभार मानले होते. यामध्ये मुख्यमंत्री यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख टाळल्याने आदेश बांदेकर यांनी पोंक्षे यांच्यात वाद झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com