esakal | अध्य़यनच्या आत्महत्येच्या खोट्या वृत्तावर शेखर सुमनचा संताप; मोदींकडे केली तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

actor shekhar suman on news channel false suicide news about son adhyayan

आपल्या सोशल मीडियावरुन शेखर सुमन यांनी सांगितले की, अशाप्रकारची चूकीची बातमी दाखवून आम्हाला खुप मोठा धक्का दिला आहे.

अध्य़यनच्या आत्महत्येच्या खोट्या वृत्तावर शेखर सुमनचा संताप; मोदींकडे केली तक्रार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्द निवेदक व अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययननं आत्महत्या केल्याची चूकीची बातमी प्रसिध्द झाल्यानं गोंधळ झाला आहे. त्यामुळे शेखर सुमन यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित न्यूज चॅनेलच्या विरोधात शेखर सुमन यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही त्या वृत्तवाहिनीला नोटीस पाठवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर शेखर सुमन हे बराच काळ आपल्या मुलाला संपर्क करत होते. मात्र त्यावेळी त्याच्याशी काही संपर्क काही होऊ शकला नाही. तोपर्यत त्यांच्या जीवात जीव नव्हता. ते अस्वस्थ झाले होते. जेव्हा संपर्क झाला तेव्हा त्यांना बरे वाटले. अध्य़यन हा सुरक्षित असून तो सध्या दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या अशा चूकीच्या बातमीमुळे शेखर सुमन हे संतापले आहेत. त्यांनी त्या वाहिनीला आपली माफी मागण्यास सांगितले असून आपण संबंधित त्या वृत्तवाहिनी विरोधात तक्रार करणार असल्याची माहिती दिली.

आपल्या सोशल मीडियावरुन शेखर सुमन यांनी सांगितले की, अशाप्रकारची चूकीची बातमी दाखवून आम्हाला खुप मोठा धक्का दिला आहे. त्या चॅनेलनं दावा केला होता की, अध्ययनंने आत्महत्या केली होती. ते कळताच आम्ही त्याच्याशी संपर्क साधला होता. तो सुखरुप आहे. मात्र ज्यानं कोणी हा खोडसाळपणा केला त्याने माफी मागावी. ती वेळ आमच्यासाठी खुपच भयानक होती. आमच्या परिवाराला खुपच मानसिक त्रास सहन करावा लागला. मी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे मागणी केली आहे की त्या चॅनलने माफी मागावी.

शेखर सुमन यांनी  माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही ती पोस्ट टॅग केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित न्य़ूज वाहिनीनं अशा प्रकारची बातमी देताना विचार करायला हवा होता. असे सुमन म्हणाले.