esakal | माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

actress shilpa shetty husband raj kundra

माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आता माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्या विरोधात ज्या माध्यमांनी बदनामीकारक वार्तांकन केलं आहे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि त्याचा पती राज कुंद्रा या दोघांच्याही विरोधात माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारचे वार्तांकन केलं आहे. त्यामुळे आता त्या वार्तांकनाच्या विरोधात शिल्पा आक्रमक झालीयं. (Actor Shilpa Shetty filed defamation suit Bombay High Court yst88)

शिल्पाच्या बाजूनं अनेक बॉलीवूड कलाकारांनी यापूर्वी आपली मतं व्यक्त केली होती. एएनआयनं व्टिटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, शिल्पानं 29 माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात काही पत्रकारांचाही समावेश आहे. ज्या माध्यमांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या विरोधात आपण न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही शिल्पानं सांगितलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज कुंद्रा आणि त्याचे पॉर्नोग्राफी प्रकरण चर्चेत आले आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या माध्यमांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे त्या माध्यमांनी बिनशर्त माफी मागावी. आणि 25 कोटींची भरपाई द्यावी. अशी मागणी शिल्पानं केली आहे.

loading image
go to top