esakal | 'मी मरेन पण तुला घेऊनच' सिद्धार्थ शुक्ला कुणाबद्दल बोलला होता...
sakal

बोलून बातमी शोधा

'मी मरेन पण तुला घेऊनच' सिद्धार्थ शुक्ला कुणाबद्दल बोलला होता...

'मी मरेन पण तुला घेऊनच' सिद्धार्थ शुक्ला कुणाबद्दल बोलला होता...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं तीन दिवसांपूर्वी निधन झालं. त्याच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्याला मोठमोठ्या सेलिब्रेटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या निधनाला एक आठवडाही पूर्ण होत नाही तोच त्याच्याविषयक काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्य़ा सिद्धार्थचा चाहतावर्ग मोठा होता. त्याच्या अकाली जाण्यानं ते अद्याप त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. आपल्या अभिनयानं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यत सगळ्याच क्षेत्रात सिद्धार्थनं आपल्या नावाचा ठसा उमटविला होता. त्यानं काही रियॅलिटी शो मध्य़े देखील भाग घेतला होता.

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये सहभागी झाल्य़ाचे दिसत आहे. त्याप्रसंगी त्याचा एका स्पर्धकाशी वाद झाला होता. तो व्हायरल झाला आहे. दरम्यानच्या काळात सिद्धार्थ आणि रश्मी देसाईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्यात झालेला वाद हा त्याच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा समोर आणला होता. आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात सिद्धार्थ कमालीचा संतापलेला दिसतो आहे. त्यात तो मरणे आणि मारणे अशी गोष्ट करतो आहे. त्याचा वाद हा सिद्धार्थ डे शी झाला होता. त्यावेळी सिद्धार्थ शुक्ला हा काही त्याच्याशी विनाकारण वाद घालत नव्हता. तर त्यानं आपली सहकारी आरती सिंगसाठी त्याच्याशी भांडण केलं होतं.

बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये सिद्धार्थ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला होता. त्याला तुफान प्रसिद्धीही मिळाली होती. तो त्या पर्वाचा विजेता होता. आपल्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना जिंकले होते. त्या स्पर्धेत सिद्धार्थचा एक वेगळ्या प्रकारचा अॅटिट्युड पाहायला मिळाला होता. एका टास्कच्या निमित्तानं त्यांच्यात वाद झाला होता. सिद्धार्थ डेवर तो भडकला. त्यानं आरतीविषयी काही अपशब्द वापरले होते. त्यावेळी सिद्धार्श शुक्ला त्याला म्हणाला होता की, मी मरेल पण तुला घेऊन. ही गोष्ट त्यानं सिद्धार्थ डे ला उद्देशुन म्हटली होती. त्यावेळी त्याला आरती आणि शहनाज गिलनं समजावलं होतं.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि अन्य काही सेलिब्रेटींनी सिद्धार्थच्या परफॉर्मन्सचं कौतूक केलं होतं. त्याच्या चाहत्यांचे म्हणणे होते की, तो महिलांचा खूप आदर करायचा. त्यांच्याविषयी कुणी अपशब्द वापरले की त्याला राग येत असे. सिद्धार्थचा बिग बॉसच्या १३ व्या सीझनमधील तो संवाद सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीड़ियावर व्हायरल झाला आहे.

loading image
go to top