
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला या मालिकेत संधी मिळाली आहे. सध्या य़ा मालिकेचा ट्रेलर लाखोंच्या संख्येनं व्हायरल झाला आहे.
मुंबई - तांडव मालिकेची उत्सुकता आता ताणली गेली आहे. प्रेक्षक ही मालिका केव्हा प्रदर्शित होणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग असणारा विषय म्हणजे तांडव ही मालिका आहे. त्यात बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते दिसणार आहे. राजकीय थ्रिलर विषयावर आधारित असणारी ही मालिका चर्चेत असणारा विषय आहे.
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला या मालिकेत संधी मिळाली आहे. सध्या य़ा मालिकेचा ट्रेलर लाखोंच्या संख्येनं व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. त्यात काम केलेल्या अभिनेता सुनीलचा अभिनयही लक्षवेधी आहे. हे सगळे होताना आपल्याला काय सांगितले होते याविषयी सुनीलनं सोशल माध्यमांवर अनुभव कथन केले आहे. कॉमेडियन सुनीलनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्याच्या घडीला लोकप्रिय कॉमेडियन म्हणून त्याचे नाव प्रसिध्द झाले आहे. आपल्याला तांडव नावाच्या मालिकेत मिळालेल्या संधीविषयी त्यानं आनंद व्यक्त केला आहे.
तांडव या मालिकेत एक गंभीर भूमिका सुनीलच्या वाट्याला आली आहे. त्यात त्यानं सैफ अली खान याच्या पर्सनल असिस्टंटचा रोल केला आहे. त्याबाबतनं सुनीलनं सांगितले की, डिरेक्टरनं मला सांगितले की, तुला मालिकेत पुरुषाची भूमिका करायची आहे. त्यामुळे मी लगेचच ही भूमिका करण्यासाठी होकार दिला होता. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनीलनं हा अनुभव शेयर केला आहे. तो म्हणाला, मला तांडवचा एक भाग होता आले याचा मला अभिमान वाटतो. याचे मुख्य कारण म्हणजे मी यापूर्वी अली अब्बास जफर यांच्याबरोबर काम केले आहे. या मालिकेसाठी एक मोठा सेटअप तयार करण्यात आला होता. मला या मालिकेचा भाग होणार का अशी विचारणा केली होती..
हे ही वाचा: आमिर खान मुलांसोबत खेळला गल्ली क्रिकेट, मात्र 'या' गोष्टीमुळे होतोय जबरदस्त ट्रोल
ज्यावेळी मला दिग्दर्शकानं माझ्या रोल विषयी सांगितले त्यावेळी मला हसु आले. ते म्हणाले, मला फक्त पुरुषांचे कपडे घालायचे आहेत आणि ते घालून रोल प्ले करायचा आहे. सुनीलला ग्रोव्हरला कपिल शर्माच्या शो मधून मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळाली. 15 जानेवारीला तांडव ही मालिका प्रदर्शित होणार आहे.