
वारीमध्ये दंग झाला स्वप्नील जोशी, विठूरायाला साकडं घालत म्हणाला..
swapnil joshi : महाराष्ट्रातला महाउत्सव आणि सर्वात मोठा सण म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्र भरातून लाखो भाविक या सोहळ्यात जात, धर्म, पंथ विसरून सहभागी होत असतात. असतात म्हणतात आयुष्यात एकदा तरी हा वारीचा चिंतनसोहळा अनुभवायला हवा. सध्या हा वारीचा प्रवास आंतील टप्प्यात आला आहे. या वारीत यंदा बरेच कलाकार सहभागी झाले होते. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, दीपाली सय्यद, संदीप पाठक, स्पृहा जोशी यांच्या पाठोपाठ आता अभिनेता स्वप्निल जोशी यानंही ( Swapnil Joshi) पायी वारीत विठुरायाला साकडं घातला आहे. वाखरी ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास करून त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
(actor swapnil joshi shared his experience of pandharpur ashadhi wari 2022 nsa95)
मराठीतील एक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ख्याती असलेला अभिनेता स्वप्नील जोशी, बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांच्या समोर आला आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेत तो प्रमुख भूमिका करत असून ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सध्या तो वारीमध्ये सलीम झाला असून त्याचा अनुभव सांगणारी पोस्ट बरीच चर्चेत आहे.
स्वप्नील म्हणतो, 'काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो, असं म्हणत संपूर्ण वारी पायी करण्याची संधी दे असं साकडं स्वप्निलनं माऊलींना घातलं. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही'.
हेही वाचा: 'मला तुझ्याकडून काहीच नको..' अभिनेता भरत जाधवची विठुरायाला अनोखी साद..
स्वप्निलनं पुढे म्हटलंय, 'आम्ही picture मधले hero! पण खरे हिरो हे वारकरी! वर्षानुवर्ष तहान भूक विसरून, पाई वारी चालतात. पायाला सूज येते, पण मनाची, विचारांची सूज कायमची निघून जाते, त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं'.
पोस्टच्या शेवटी स्वप्निल भावूक होत म्हणाला, 'लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत. हा "प्रवास" प्रत्येकाने एकदा तरी करावाच. माझी आजी म्हणायची..."तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !" काल मला कळलं ती काय म्हणायची... अशी पोस्ट त्याने शेयर केली आहे. वारीच्या या टप्प्यात स्वप्निल जोशी आणि त्याच्या संपूर्म टीमनं वारकऱ्यांना अन्नदान केलं. त्यांच्या बसण्याची सोय, पाण्याची सोय, पत्राशेड, अशी बरीच मदत त्याने आणि त्यांच्या टीमने केली.
Web Title: Actor Swapnil Joshi Shared His Experience Of Pandharpur Ashadhi Wari 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..