वादाची ठिणगी? वैभव मांगलेचा 'अलबत्या गलबत्या', 'इब्लिस' नाटकाला रामराम.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor vaibhav mangle left albtya galbatya and iblis marathi drama because of dispute

वादाची ठिणगी? वैभव मांगलेचा 'अलबत्या गलबत्या', 'इब्लिस' नाटकाला रामराम..

vaibhav mangle: अभिनेते वैभव मांगले सध्या बरेच चर्चेत आहेत. नुकताच येऊन गेलेला त्यांचा टाइमपास 3 सिनेमा असतो किंवा सध्या जी मराठी वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमात ते साकारत असलेली चिंची चेटकीणीची भूमिका असो. शिवाय वैभव सातत्याने विविध विषयांवर भाष्य करत असतो. आज वैभव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वैभवला ज्या नाटकाने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली ते 'अलबत्या गलबत्या' हे नाटक त्याने सोडले आहे. याबाबत एक पोस्ट त्याने नुकतीच शेअर केली. त्याने नाटक का सोडले हे अद्याप समोर आले नसले तरी त्यामागे निर्माता राहुल भंडारे यांच्याशी काहीतरी बिनसले असल्याची कुजबूज मनोरंजन विश्वात आहे. (actor vaibhav mangle left albtya galbatya and iblis marathi drama because of dispute )

रत्नाकर मतकरी लिखित चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ (Albatya Galbatya) या बालनाट्याने अनेक विक्रम मोडून काढले. या नाटकाला चिमुकल्यांची अक्षरशः झुंबड उडायची. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी साकारलेल्या चिंचि चेटकिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र, आता वैभव मांगले यांनी या भूमिकेतून आणि या नाटकातून एक्झिट घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे.

या पोस्ट मध्ये अभिनेते वैभव मांगले म्हणतात, 'प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ‘ती मी नाहीच’. वैभव मांगले यांच्या या पोस्ट नंतर अनेक चर्चा सुरू झाले आहेत. या नाटकाची अद्वैत थिएटर या नाट्य संस्थेने निर्मिती केली होती. या संस्थेचे निर्माते राहुल भंडारे आणि मांगले यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. याबाबत वैभव मांगले आणि निर्माते राहुल भंडारे यांनी कुणीही स्पष्टता दिली नसली तरी मांगले यांच्या पोस्ट वरुन त्यांची नाराजी उघडपणे दिसून येते.

मांगले यांच्या पोस्ट नंतर या नाटकाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. सध्या निर्मात्यांनी नाटकासाठी नवी चिंची चेटकीण शोधली असून त्या अभिनेत्याचे नाव निलेश गोपनारायण असे आहे. नीलेशचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. त्यामुळे वैभवच्या जाण्याने नाटकावर काय परिणाम होणार हे लवकरच कळेल. तसे दोन्ही कलाकार मेकप नंतर सारखेच दिसत आहेत. नुकतीच या नाटकाच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा झाली. नाटकाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर वैभव मांगले यांना प्रेक्षकांकडून विचारणा होऊ लागली की, आम्ही येतोय नाटकाला, आम्हाला भेटू शकाल का? चाहत्यांच्या या विचारणेनंतर, दुसऱ्या एका अभिनेत्याला वैभव मांगले समजून प्रेक्षकांचा भ्रमनिरास होऊ नये, म्हणून वैभव मांगले यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.  

एवढेच नाही तर याच निर्मिती संस्थेच्या म्हणजेच अद्वैतच्या 'इब्लिस' नाटकातही वैभव मांगले प्रमुख भूमिकेत होते. वैभवने हे नाटक देखील सोडले असून या नाटक आता अभिनेते अजय पुरकर वैभव साकारत असलेली भूमिका साकारत आहे.

या संपूर्ण प्रकरणावर निर्माते राहुल भंडारे 'सकाळ डिजिटल'शी बोलताना म्हणाले, 'अभिनेते वैभव मांगले यांच्याकडे सध्या बरेच प्रोजेक्ट आहेत. 'वाडा चिरेबंदी' , 'संज्या छाया' ही दोन नाटकं आणि मालिकाही सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या वेळ नाही. म्हणूनच आपण दुसरे कलाकार घेऊन नाटक पुढे सुरू ठेवलं. याबाबत वैभवला विश्वासात घेऊन निर्णय घेतले आहेत. यामागे दुसरे कोणतेही कारण नाही.'

Web Title: Actor Vaibhav Mangle Left Albtya Galbatya And Iblis Marathi Drama Because Of Dispute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..