अभिनेते विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात भांडण.. 'हे' कारण आलं समोर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor vidyadhar joshi and atul kale on screen fight jivachi hotiya kahili serial on sony marathi

अभिनेते विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात भांडण.. 'हे' कारण आलं समोर..

jivachi hotiya kahili : आपल्याला सर्वांनाच परिचित असणारे दिग्गज अभिनेते विद्याधर जोशी (vidyadhar joshi) आणि अतुल काळे (atul kale) चक्क एकमेकांशी भांडले आहे. त्यांच्या मोठा वाद झाला असून त्याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर होणार आहे, आता तुम्ही म्हणाल हे झालं कुठे तर तर हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहून भांडणार आहेत, आणि हे भांडण रंगणार आहे, 'जीवाची होतिया काहिली' या मालिकेमध्ये..

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करते आहे. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत. (actor vidyadhar joshi and atul kale on screen fight jivachi hotiya kahili serial on sony marathi)

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे.

कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. ही मालिका १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

Web Title: Actor Vidyadhar Joshi And Atul Kale On Screen Fight Jivachi Hotiya Kahili Serial On Sony Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..