मल्याळम अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन, चित्रीकरण सुरू असतानाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor VP Khalid passes away during the shoot

मल्याळम अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन, चित्रीकरण सुरू असतानाच..

VP Khalid passes away : ज्येष्ठ मल्याळम अभिनेते व्ही पी खालिद (VP Khalid) यांचे शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. व्ही पी खालिद हे वक्कममध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. चित्रीकरणावेळी सेटवरील बाथरूममध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. (actor VP Khalid passes away during the shoot)

हेही वाचा: 'वारी ही प्रथा नाही तर हजारो वर्षांची उपासना' हा आहे वारीचा हरिमय इतिहास..

व्हीपी खालिद हे टोविनो थॉमस यांच आगामी चित्रपटावर काम करत होते. चित्रीकरण सुरू असताना चित्रीकरण स्थळी नाश्ता करून खालिद टॉयलेटमध्ये गेले होते. बराच वेळ ते परत न आल्याने सेटवर सगळेच त्यांचा शोध घेऊन लागले. मग ते बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: 'आय लव्ह उद्धव..' महाराष्ट्राच्या राजकारणावर काय म्हणले लकी अली..

व्हीपी खालिद यांची 'मरिमयम' मालिकेतील ‘सुमेश’ ही भूमिका विशेष गाजली. त्यांनी त्यांच्या विनोदाने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली. व्ही पी खालिद हे एक अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अलेप्पी थिएटर्समध्ये दीर्घकाळ काम केले होते. इतकंच नाही, तर त्याने चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचे मुलं शैजू, जिमशी आणि दिग्दर्शक खालिद रहमान देखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.

Web Title: Actor Vp Khalid Passes Away During The Shoot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..