
Animal Movie News: 'अॅनिमल' सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर गाजतोय. सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे झाले असले तरीही सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे. 'अॅनिमल'बद्दल अनेक बऱ्या - वाईट प्रतिक्रिया समोर येत असल्या तरीही सिनेमाने बॉक्स ऑफीसवर छप्परफाड कमाई केलीय.
अशातच 'अॅनिमल'चं सिनेमाबद्दल एक खास गोष्ट समोर आलीय. 'अॅनिमल'च्या कलाकारांनी चालू विमानप्रवासात एका चाहत्याची इच्छा पूर्ण केलीय.
'अॅनिमल' चित्रपटाच्या स्टार कास्टचा व्हिडिओ गीता छेत्री या सोशल मीडिया यूजरने इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेता रणबीर कपूर 'फ्लाइट अटेंडंट' गीताच्या शर्टवर मागील बाजूने ऑटोग्राफ देत आहे.
त्याचवेळी 'लॉर्ड बॉबी' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता बॉबी देओल गीताशी हशामस्करी करत तिच्या खांद्यावर ऑटोग्राफ देत आहे.
'अॅनिमल' चित्रपटाची लीड रश्मिका मंदान्ना देखील फ्लाइटमध्ये उपस्थित होती. तिनेही गीताच्या शर्टवर तिचा ऑटोग्राफही दिला.
बॉक्स ऑफीसवर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं आतापर्यत पूर्ण जगभरातून ७७२.३३ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. 'अॅनिमल'ने आतापर्यंत आठशे कोटींचा टप्पा पार केल्याचं बोलले जात आहे.
येत्या आठवड्यात 'अॅनिमल' चित्रपट आणखी मोठी मजल मारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रदर्शित झाल्यापासून 'अॅनिमल'च्या वाट्याला तुफान प्रतिसाद मिळतो आहे.
अॅनिमलच्या स्टारकास्ट विषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी, सौरभ सचदेव, प्रेम चोप्रा आणि सुरेश ऑबेरॉय यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. संदीर रेड्डी वांगानं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यानं यापूर्वी कबीर सिंग आणि अर्जून रेड्डी नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.