
अमृतानं हिरव्या बिकिनीमधील एक फोटो आधी शेअर केला. त्या फोटोवर चाहत्यांकडून हजारोंच्या संख्येने लाईक्सचा पाऊस पडला.
अमृता देशमुखच्या ‘बोल्ड बिकिनी लूक’चीच सोशल मीडियात धूम
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत खुप कमी कालावधीत नावाजलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख होय. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळीच छाप मराठी इंडस्ट्रीत निर्माण केली आहे.
तिच्या अभिनयामुळे तिचा एक वेगळा फॅनक्लब तयार झाला आहे. ती आपले वेगवेगळे फोटो व व्हिडीओ शुटमुळे नेहमी सोशल मीडियात चर्चेत असते. सध्या अमृताने केलेल्या बिकीनीमधील बोल्ड फोटोशुटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अमृताच्या या फोटोशुटचीच सध्या सोशल मीडियात चर्चा होत आहे. अमृता सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी युवा यांसारख्या बड्या वाहिनींवरील मराठी मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. विविध मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केल्यानंतर आता अमृता बिकिनी घातलेल्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
'स्टार प्रवाह'च्या तुमचं आमचं सेम असतं या मालिकेत तिने गौरीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतील परी देशमुख हे पात्र तिने चांगलंच गाजवलं. यामुळेच ती प्रकाशझोतात आली. तिला अभिनयाच्या चांगल्या मिळत गेल्या.
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने ७ अभिनेत्यांसोबत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर अमृताने स्वीटी सातारकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली. पण सध्या तिच्या बिकीनीच्या फोटोंमुळे सोशल मिडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. गावरान पद्धतीच्या भूमिका करताना तिला नेहमीच पाहिलं गेलंय.
चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये ती बहुतांश वेळा साडी किंवा पंजाबी ड्रेसमध्ये दिसली. पण सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड अशा बिकिनी लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हिरव्या बिकिनीमधला तिचा एक फोटो तिने आधी शेअर केला. त्या फोटोवर चाहत्यांकडून हजारोंच्या संख्येने लाईक्सचा पाऊस पडला. अनेकदा मराठी अभिनेत्रींनी बिकिनीतील हॉट फोटो शेअर केल्यानंतर त्यांना ट्रोल केलं जातं.
ट्रोलिंगचा प्रश्न येऊ नये म्हणून अशा गोष्टी न घडण्यासाठी तिने फोटो पोस्ट केल्यावर 'कमेन्ट बॉक्स'च बंद ठेवला. पण कमेंट बॉक्स बंद असला तरी तिचा हा हॉट आणि सेक्सी अंदाज याचीच सध्या चर्चा होत आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
Web Title: Actress Amruta Deshmukh Bold Look
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..