
अमृता खानविलकरला घाम येतो का? पाहा काय म्हणाली अभिनेत्री..
Amruta khanvilkar : अमृता खानविलकर सध्या चर्चेचा विषय आहे. करण तिच्या बिग बजेट असलेल्या 'चंद्रमुखी' या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली. त्यातील 'चंद्रा' या गाण्यावर लॉक आजही थिरकतात. त्यामुळे चित्रपट येऊन बराच काळ लोटला तरी चित्रपटाची भुरळ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. अमृताने नुकतीच 'झी मराठी' वरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिला काही विचित्र प्रश्न विचारण्यात आले. पण अमृतानेही त्यावर भन्नाट उत्तरे देत सर्वांना चकित केले.
गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जातात. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांना अनेक राजकीय, आणि वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले. आता ह्या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खालविलकरने हजेरी लावली. यावेळी अमूर्ताला विचारण्यात आलेले प्रश्न ऐकून तीही हसून वेडी झाली.
या शो मध्ये अमृताला विचारलं की 'तुम्हाला घाम येतो का?' यावर अमृता हसत-हसत उत्तर देते, '' तू हा मला प्रश्न विचारलंस हे तर ठीक आहे. पण नंतर यावर मिम्स किती तयार होणार याची तुला कल्पनासुद्धा नाहीय. अभिनेत्री असले तरी मी एक माणूस आहे. आणि निश्चितच मलासुद्धा घाम येतो. पण शूटिंगदरम्यान सेटवर मी एक छोटा फॅन सोबत ठेवते. जेणेकरून मला कमीत कमी घाम येईल याची मी काळजी घेते. आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून मुंबईमध्ये आल्यांनतर तुम्हाला उष्णतेची जाणीव होतेच'. अमृताला विचारण्यात आलेला हा प्रश्न आणि तिने दिलेले उत्तर हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.