बाई, बाई, बाई, तिनं केसांवर मारल्या दोर उड्या; Video व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

बियांका ब्लेयर असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. ती एक प्रसिद्ध WWE रेस्लर आणि अभिनेत्री आहे.

 मुंबई - कशासाठी तर प्रसिध्दीसाठी असं सारं भवताली घडताना दिसत आहे. प्रसिध्दी मिळावी, सोशल मीडियावर आपलं नाव व्हावं शेकडो, हजारोच्या संख्येनं त्याला लाईक्स मिळावे यासाठी अनेकजण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करताना दिसतात. अशावेळी त्यांच्या त्या अचाट पराक्रमांमुळे थक्क व्हायला होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटक-यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

सहजासहजी लोकप्रियता मिळावी यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या  आयडियांचा प्रत्यक्षात वापर करतात. त्यात वेगळेपणा असल्यास त्यांना वारेमाप प्रसिध्दी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळते. अशीच प्रसिध्दी एका महिला रेस्लरला मिळाल्याचे दिसून आले आहे. बियांका ब्लेयर असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. ती एक प्रसिद्ध WWE रेस्लर आणि अभिनेत्री आहे. बियांका युनिक फाईटिंग स्टाईलसोबतच आपल्या लांबलचक केसांसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचे कित्येक व्हिडिओ तिनं शेयर केले आहेत. आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या उद्देशानं एका वेगळ्या कारणासाठीू तिनं एवढी मोठी केसं ठेवली आहेत.

सध्या तिचा केसांविषयीचा व्हिडिओ प्रदर्शित झाला त्यात तिनं असे काही केले आहे की पाहणारा चकित होऊन जातो. बियांकानं   WWE रिंगमध्ये केसांचा वापर केलेला आहे बियांकानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्या व्हिडीओमध्ये ती आपल्या केसांचा वापर व्यायाम करण्यासाठी करताना दिसत आहे. ती आपल्या लांबलचक केसांच्या मदतीनं दोर उड्या मारताना दिसत आहे.  तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून त्याला काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress and wwe wrestler Bianca viral video of skipping with hair popular on social platform