दुबईच्या वाळवंटात शेवंताचा बेली डान्स, VIDEO

दुबईच्या वाळवंटात शेवंताचा 'लैला हो लैला' गाण्यावर जबरदस्त बेली डान्स
apurva nemlekar
apurva nemlekar esakal
Updated on

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर( apurva nemlekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे फोटो व व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपूर्वा चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. दरम्यान, शेवंताचा दुबईच्या वाळवंटामधील बेली डान्स व्हायरल होत आहे.

apurva nemlekar
'बोल्ड सीन पाहताना मराठी प्रेक्षक...' तेजस्विनी,प्राजक्ता स्पष्टच बोलल्या

शेवंता सध्या दुबई दोऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच अपूर्वा तिच्या आईसोबत दुबईवारीला गेली आहे. तिथेच ती तिच्या नव्या प्रोजेक्टवरही काम करत असल्यांच म्हटलं जात आहे.

नुकताच दुबईच्या वाळंवटातील अपूर्वाचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती एका नाईट इव्हेंटला गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. तिथे बेली डान्सरला पाहून अपूर्वालादेखील मोह आरला नाही. डान्सरचा डान्स पाहून अपूर्वादेखील बेली डान्स करताना दिसली. तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

apurva nemlekar
...म्हणून स्पीलबर्गने अमिरची ओळख जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया' अशी करुन दिली

शेवंताने Dance to feel good. Dance to feel better. Dance to mend a broken heart. Just dance अशी व्हिडीओल कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून ती दुबई ट्रीपचे फोटो असतील किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. रात्रीस खेळ चाले 3' मालिका सोडल्यानंतर नुकतीच ती 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सध्या अपूर्वा तिच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत असून तिला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com