Actress Asmita Deshmukh कडून जाणून घ्या फॅशन टीप्स

कॉटनचे सिंपल ड्रेस आवडीचे - अभिनेत्री अस्मिता देशमुख
Actress Asmita Deshmukh
Actress Asmita Deshmukh
Updated on

खरंतर मला सर्व प्रकारचे ड्रेस परिधान करायला आवडतात. पण सर्वात जास्त मला कॉटनचे ड्रेस, साडी आणि फ्रॉक्स जास्त आवडतात. अगदी सणवार असतील किंवा कार्यक्रम असेल किंवा बाहेर फिरायला जातना देखील मी कॉटनचे आउटफिट्स वापरते. कारण, माझ्या व्यक्तिमत्वाला कॉटनचे सिंपल ड्रेस खुप सूट करतात.

फॅशन करताना किंवा कोणतेही ड्रेस घालताना आपण त्यात कम्फर्टबल असणे खुप महत्वाचे आहे. जोपर्यंत ड्रेस आपल्याला पूर्ण फिटिंगमध्ये बसत नाही, तोपर्यंत आपल्याला सकारात्मक वाटत नाही.

आपण व्यवस्थित कपडे परिधान केले अन ते आपल्या स्वतःलाही आवडले तर त्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. मी 'झी टीव्ही' वरील 'देवमाणूस' या मालिकेत डिंपलची भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मला आउटफिट निवडताना अन् फॅशन करताना खूप काळजी घ्यावी लागते.

माझ्या शरिरयष्टीला व स्किन टोनला सूट होणाऱ्या रंगांचे आउटफिट मला आवडतात. कारण, रंग आपल्याला एकप्रकारे एनर्जी देण्याचे काम करत असतात. त्यातून आपला मूडही फ्रेश राहतो. खरंतर आपले व्यक्तिमत्व खुलविण्याचा अन् स्वतःला आनंदी ठेवण्यात आवडीच्या व आपल्याला शोभतील अशा रंगांच्या आउटफिटचा मोलाचा वाटा असतो.

माझे आउटफिट्स निवडताना मी कोणालाही फॉलो करत नाही; पण माझी आई स्वतः फॅशन डिझायनर आहे. त्यामूळे तिने तयार केलेले आउटफिट्स मी खुप आवडीने परिधान करते.

फॅशन टिप्स-

1) तुमची शरीरयष्टी व्यवस्थित दिसेल असे कपडे परिधान करावेत.

2) तुम्हाला आनंद वाटेल आणि त्यातून सकारात्मकता येईल; तसेच त्यातून कमर्फटेबल वाटेल, असेच कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्या.

3) कोणत्या ठिकाण जातोय, तेथे काय समारंभ वा कार्यक्रम आणि तेथील परिस्थिती कशी आहे, हे पाहून त्यानुसार कपडे परिधान करावे.

4) आपल्या कपड्यांची तुलना इतरांच्या कपड्यांशी करू नका.

5) तुम्हाला ज्या रंगाचे आणि फॅशनचे कपडे घाला; कारण त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com