'काय लोकं असतात, कुणाशी बोलत नाही म्हणून,सेक्स रॅकेटचा आरोप लावला' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress deepti naval birthday special intresting facts about her life

80 च्या दशकात दीप्ती या समांतर चित्रपटासाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री आहेत. त्या सिनेमांमधील त्यांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला.

'काय लोकं असतात, कुणाशी बोलत नाही म्हणून,सेक्स रॅकेटचा आरोप लावला'

मुंबई - अभिनेत्री, चित्रकार, फोटोग्राफर, लेखिका, दिग्दर्शिका, निर्मात्या म्हणून प्रसिध्द असणारी कलाकार म्हणून दीप्ती नवल यांचे नाव घ्यावे लागेल. तीन फेब्रुवारीला त्या आपला जन्मदिवस साजरा करणार आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात श्याम बेनेगल यांच्या १९७८ साली आलेल्या जुनून चित्रपटापासून सुरुवात केली होती. त्या चित्रपटामध्ये सर्व बडे कलाकार होते. त्यात त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका लहान होती. मात्र त्यात त्यांनी लक्ष वेधून घेतली होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्या मुख्य भूमिकेत दिसून आल्या. त्यांच्या जोडीला स्मिता पाटील आणि शबाना आझमी या दिग्गज अभिनेत्री होत्या.

८० च्या दशकात दीप्ती या समांतर चित्रपटासाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री आहेत. त्या सिनेमा्ंमधील त्यांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला. त्यांच्या काही चित्रपटांचा उल्लेख करायचा झाल्यास कमला, चश्मेबद्दुर, एक बार फिर, अनकही, बवंडर, लीला आणि फिराक सारख्या चित्रपटांमध्येही त्यांचे काम प्रेक्षकांना आवडले होते. अभिनयाव्यतिरिक्त त्या आपल्या रोखठोक भूमिकेबद्दलही ओळखल्या जातात. सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग मोठा आहे. १९८१ मध्ये दीप्ती नवल या फारुख शेख यांच्या बरोबर चश्मेबद्दुर चित्रपटांत दिसुन आल्या होत्या. त्या दोघांच्या जोडीला विशेष पसंद करण्यात आले होते. त्यानंतर त्या दोघांनी साथ साथ, किसी से ना कहना, कथा, बिरंगी और फासले या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. जवळपास तीन दशकानंतर ते २०११ मध्ये टेल मी ओ खुदा सारख्या चित्रपटांमध्ये दिसले होते.

पुढे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी चश्मे बद्दूरचा रिमेक बनवला होता. त्यात दीप्ती नवल यांची भूमिका तापसी पन्नूनं केली होती. याविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझी आणि फारुख शेख यांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार आले होते. मी त्यांच्याशी बोलत असताना मला सोसायटीवाल्यांनी मुलाखत देऊ नको असे सांगितले. त्यांना असे वाटले की शुटिंग चालू आहे. त्यामुळे जास्त चिडले. यामुळे मी चांगलीच वैतागली होते. पुढे ते घर मी सोडून दिले. आता त्याला ३० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.

एका मुलाखतीत दीप्ती यांनी सांगितले होते की, मी ज्या ठिकाणी राहत होते तिथे कुणी फ्लॅट घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी मी तिथे घर घेतले होते. मी तिथे पार्टी करत असे. अनेक पत्रकार मला भेटायला येत असत. मी कुठले एखादे सेक्स रॅकेट चालवते आहे असा अनेकांचा गैरसमज झाला होता. माझी चूक एवढीच होती की मी कुणाशी बोलायला जात नव्हते. त्यावेळी दीप्ती नवल यांची ती मुलाखत पूर्ण न वाचताच लोकांनी वेगळे अर्थ लावले होते. याचा त्यांना मोठा मनस्ताप झाला होता.