esakal | अभिनेत्री दिशा पटानीचे वडिल कोरोना पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

disha patani father

अभिनेत्री दिशा पटानीचे वडिल जगदीश पटानी यांना कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग झाल्याचं कळतंय. जगदीश यांच्यासोबत विद्युत विभागाचे तीन अधिकारी देखील कोव्हिड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

अभिनेत्री दिशा पटानीचे वडिल कोरोना पॉझिटीव्ह

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोना व्हायरचा विळख्यात बॉलीवूडच्या अनेक मंडळी आल्या आहेत. आता बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीचे वडिल जगदीश पटानी यांना कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग झाल्याचं कळतंय. जगदीश यांच्यासोबत विद्युत विभागाचे तीन अधिकारी देखील कोव्हिड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी  डॉ. अशोक कुमार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेकचा ७०च्या दशकातील लूक तोही बेबी फिल्टरसोबत, पाहा मजेशीर व्हिडिओ  

अशोक कुमार यांनी बुधवारी सांगितलं की 'दिशाचे वडिल जगदीश पटानी आणि विभागाचे दोन अधिकारी ट्रांसफॉर्मर घोटाळ्याच्या तपासासाठी लखनऊमध्ये आले होते. तीनही अधिका-यांचे रिपोर्ट हाती आले असून तिघंही कोव्हिड पॉझिटीव्ह आले आहेत.' कुमार यांनी पुढे सांगितलं की, 'अभिनेत्री दिशा पटानीचे वडिल विद्युत विभागाच्या दक्षता युनिटचे उपअधीक्षक पोलिस या पदावर आहेत. सध्या विभागीय मुख्य अभियंता कार्यालय ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.' 

काही दिवसांपूर्वी दिशाचे वडिल जगदीश पटानी सायबर गुन्हेगारांना बळी पडण्यापासून वाचले होते. त्यांचा क्लोन फेसबुक आयडी बनवून काही ओळखीच्या व्यक्तींना मेसेज पाठवले गेले होते. मात्र वेळेत याची माहिती मिळाल्याने सायबर गुन्हेगारांना प्लान फसला. जगदीश यांनी याची तक्रार सायबर सेलमध्ये केली होती. 

अभिनेत्री दिशा पटानीबाबत सांगायचं झालं तर ती सलमानच्या आगामी 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' आणि 'एक विलन-२' या सिनेमांमध्ये दिसून येणार आहे. 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या सिनेमामध्ये सलमान खान, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार असल्याचं कळतंय.  

actress disha patani father jagdish patani tested positive for covid19