या अभिनेत्रीचा 20 वर्षांपूर्वीचा बिकिनीतील फोटो झाला व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

या अभिनेत्रीने तिच्या फोटोला 'तेव्हा आणि आता... 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालदिवमध्ये... तेव्हाचा स्वीमसूट अजूनही फिट होतोय!' असे कॅप्शन दिले आहे.

'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजमध्ये गाजलेली 'सलोनी भट' म्हणजेच अभिनेत्री गुल पनाग अजून एका कारणाने चर्चेत आली आहे. गुल पनागने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोवरून ती पुन्हा एकदा 'हॉट टॉपिक' बनली आहे. सध्या व्हायरल होणारा कोणता आहे तो फोटो?

गुल पनाग सध्या मालदिवमध्ये सुट्या सेलिब्रेट करत आहे. तिने तिकडचे काही फोटो इन्स्टाग्रमावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एका फोटो कोलाजमध्ये ती बिकीनी सूट मध्ये दिसतीये. या कोलाजमध्ये दोन फोटो आहेत. एका 1999 मधील, तर एक आताचा 2019 मधील... दोन्ही फोटोंमध्ये तिने बिकीनी सूट घालाय आणि मालदिवच्या बीचवर उभी आहे. या दोन्ही फोटोंमध्ये काहीच फरक नाही. दोन्ही फोटोंत गुल अत्यंत आकर्षक, फीट आणि बॉल्ड दिसत आहे. या फोटोला तिने 'तेव्हा आणि आता... 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालदिवमध्ये... तेव्हाचा स्वीमसूट अजूनही फिट होतोय!' असे कॅप्शन दिले आहे. तिच्यातील हा सारखेपणा बघून नेटीझन्स आणि फॅन्सने तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या फिटनेसची चर्चा होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Then and now. Back in Maldives after twenty years!! My @marksandspencer swimsuit still going strong .

A post shared by Gul Panag (@gulpanag) on

या फोटोंसह तिने तिच्या लहान मुलासोबतचेही काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आणि तिचा मुलगा मस्ती करताना, समुद्रात मजा करताना दिसत आहेत. कामाच्या व्यापातून वेळ काढून तिने मुलासोबत ट्रिप एन्जॉय केलीय. त्यामुळे तिच्या बिकीनीतील फोटोंप्रमाणेच मुलासोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत. 

गुल पनाग कायमच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसते. मग तो 'डोर' असो किंवा 'धूप' असो! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजमध्ये तिने सलोनी भट या लष्करी अधिकाऱ्य़ाची भूमिका वठवली आहे. या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. गुल पनाग कायम सोशल मीड्यावर अॅक्टिव्ह असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सुंदर क्षणांच फोटो व व्हिडिओ ती कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. आता पुन्हा बिकीनीतील फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Gul Panag s bikini photos gets viral on social media