ईशा केसकर मोठ्या भूमिकेत; साकारणार सईबाई राणी सरकार.. | isha keskar as saibai rani sarkar in sher shivraj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

isha keskar as  saibai rani sarkar

ईशा केसकर मोठ्या भूमिकेत; साकारणार सईबाई राणी सरकार..

मराठीतील बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त अशी जिची ख्याती आहे, ती अभिनेत्री ईशा केसकर (isha keskar) एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजवर ईशाने तिच्या अभिनयाने मालिका विश्वात महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. झी मराठी (zee marathi) वरील 'जय मल्हार' (jay malhar) मालिकेतील माता बानुबाईंची भूमिका असो किंवा 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया असो. तिच्या सर्व भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता पुन्हा एकदा ती एक आगळीवेगळी भूमिका घेऊन आली आहे. विशेष म्हणजे ही एक ऐतिसाहिक भूमिका आहे.

हेही वाचा: मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले.. शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..

सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे जोरात वाहत आहेत. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा दाखवण्याकडे अनेकांचा कल आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका 'अष्टक' करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चौथे पुष्प लवकरच प्रेक्षक भेटीसाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा: दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक...

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज’ (she shivraj) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'येळकोट देवाचा' हे गाणे देखील प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा खात्मा, त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळेल.आता या चित्रपटातील विविध भूमिकांचा उलगडा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्पाल लांजेकर (digpal lanjekar) स्वतः बहिर्जी नाईक (bahirji naik) यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर केले. आता आणखी एक महत्वाची भूमिका समोर अली आहे.

ही भूमिका म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई राणी सरकार. (isha keskar as saibai rani sarkar in sher shivaj film) या चित्रपटात या भूमिकेचे विशेष महत्व असणार आहे आणि दिग्पाल ने या भूमिकेसाठी अभिनेत्री ईशा केसकर ची निवड केली आहे. इशाचा सईबाई राणी सरकारांच्या भूमिकेतून लुक नुकताच रिव्हील आला असून ईशा त्यात अत्यंत गोड दिसत आहे. शिवाय ''तुमच्या वाटेतला अडथळा न होता तुमच्या वाटेवर तुमची सावली बनून रहायचं होतं...'' असे कॅप्शन या फोटोला देऊन सईबाईंची महती देखील सांगितली आहे. ईशा या भूमिकेला न्याय देईल अशी खात्री अनेकांनी दिली आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. येत्या २२ एप्रिल ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Actress Isha Keshkar Play Saibai Rani Sarkar Role In Sher Shivraj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..