पाकिस्तानात येणार भाजपची सत्ता; कंगणा बोलली विषय संपला 

actress Kananga ranaut said bjp leading party in Pakistan tweet viral on soil media
actress Kananga ranaut said bjp leading party in Pakistan tweet viral on soil media

मुंबई - अभिनेत्री कंगणाचा एक दिवस असा जात नाही ज्यात तिच्या नावाची चर्चा होत नाही. किंबहुना तिला त्याशिवाय चैन पडत नसल्याचे दिसून आले आहे. कंगणा सध्याच्या घडीला प्रभावी सेलिब्रेटींपैकी एक आहे. ती सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी कुणाचा वाद ओढावून घेते, कधी कुणावर टीका करते तर कधी स्वतबद्दल आत्मप्रौढीने बढाया मारत सुटते. त्यावेळी आपण काय आणि कुणाविषयी बोलत आहोत याचे तिला भान नसते. आताही कंगणाचे एक व्टिट भलतेच व्हायरल झाले आहे. त्यात तिनं केलेला दावा मोठा अजब आहे. यावरुन ती ट्रोलही होत आहे. मात्र यासगळ्याची कंगणाला कसलीही फिकिर नाही.

आपण जे बोलतो त्यावर ठाम असतो असा सूर कंगणाच्या बोलण्यामागचा असतो. त्यामुळे सोशल मीडियावर एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा आहे. तिनंही ती जाणीवपूर्वक नकारात्मक केली आहे असा सूर अनेकजण व्यक्त करतात. दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनात तिनं घेतलेली विरोधी भूमिका, प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांच्यावर केलेली टीका, हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री मेरिल स्ट्रीपबरोबर केलेली तुलना आणि गेल्या काही दिवसांपूर्वी प्रख्यात अभिनेत्री तापसी पन्नुला तुझ्यासारखी स्वस्त तुच आहे असे म्हणूनही कंगणानं नवा वाद सुरु केला होता.

आता कंगणा एका वेगळ्या कारणासाठी सर्वांच्या चर्चेत आली आहे. तिचं एक विधान भलतचं चर्चेत आलं आहे. कंगणा जे काय बोलली ते सांगितल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कंगणा म्हणाली,  भारत पाकिस्तानला 4.5 कोटी कोरोना प्रतिबंधक लशींचा  पुरवठा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानला लसींचा पुरवठा करणार असल्याचे समजल्यानंतर कंगनाने ट्विट करत पाकिस्तानतही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सध्या देशात लशीकरणाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. भारत वेगवेगळ्या देशांना लस पाठवत आहे. ज्या देशांना लस पाठविण्यात येत आहे त्या यादीत पाकिस्तानचे नाव नव्हते. आता United GAVI Alliance या करारातर्गंत पाकिस्तानला कोरोना लसींचा पुरवठा करणार आहे. यामुळे आता जगातील निम्म्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण करण्यात येणार आहे. कंगणानं व्टिटमध्ये म्हटले आहे की,  मोदीजी म्हणत आहेत की, तो देखील (पाकिस्तान) भारताचाच भाग आहे. तिथे देखील लवकरच भाजपाचे सरकार असणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com