esakal | शांत बसली तर ती कंगणा कसली, आता जे बोलली ते तर एकदम कडकच...
sakal

बोलून बातमी शोधा

actress Kananga ranaut says no woman centric film had impact greater than manikarnika

कंगणानं मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी नावाच्या चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका केली होती.

शांत बसली तर ती कंगणा कसली, आता जे बोलली ते तर एकदम कडकच...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई -  वाद- विवाद, भांडण, टीका, याचे दुसरे नाव कंगणा असे आता म्हणता येईल. दरवेळी कंगणा नव्यानं एखादी वेगळी प्रतिक्रिया देऊन सर्वाचे लक्ष वेधून घेताना दिसते. कुठलीही गोष्ट असु देत कंगणाला त्यावर आपले मत नोंदविण्याची घाई झालेली असते. आताही तिनं एक वेगळी प्रतिक्रिया देऊन एका नव्या विषयाला तोंड फोडले आहे. कंगणाचं असे म्हणणे आहे की, महिलांवरील चित्रपट फारसे चालत नाही. लोकांना ते आवडत नाही त्याचे कारण त्या चित्रपटांमधील महिला कलावंत हा असल्याचे तिनं सांगितले आहे. कंगणा असे का म्हणाली हे जाणून घेऊया.

कंगणानं मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी नावाच्या चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका केली होती. त्यावरुन तिनं भाष्य केलं आहे. 2019 मध्ये मणिकर्णिका चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांची त्याला चांगली पसंती मिळाली होती. तिनं आता व्टिटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते की, कंगणाशिवाय अशा एखाद्या अभिनेत्रीचं नाव सांगा जिच्या चित्रपटांचा प्रभाव आहे. मणिकर्णिका ही लाखो मुलींसाठी प्रेरणादायी आहे. आता मला आशा आहे की, थलाईवी, धाकड, तेजस आणि द्दीदा नावाचे चित्रपटांचाही असाच प्रवास होईल.

काही दिवसांपूर्वी कंगणा चर्चेत आली होती. त्याचे कारण म्हणजे तिनं जगप्रसिध्द अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी स्वताची तुलना केली होती. त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र त्याचा कंगणावर काही एक परिणाम झाला नाही. आपण आहोत म्हणून चित्रपट प्रेक्षक पाहतात. अन्यथा दुसरी एखादी महिला कलाकार मुख्य पात्र असताना चाललेल्या चित्रपटांची नावे सांगा. असे म्हटल्यावर लवकर नावं सांगता येणार नाही. असेही कंगणा एकदा म्हणाली होती. तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीवर ती म्हणाली होती तिच्या जाण्यानंतर मीच होते की जिनं कॉमेडी हा प्रकार हाताळला.

वास्तविक ती गोष्ट कंगणानं तनु वेडस् मनुच्या अनुषंगानं सांगितले होते. ती म्हणाली होती की, त्या चित्रपटानं माझ्याकडे अनेकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असे सांगावे लागेल. त्यानंतर माझी मेनस्ट्रीममध्ये एंट्री झाली होती. क्वीन आणि दत्तोच्या भूमिकेनं माझे कॉमेडीचे टायमिंग चांगले झाले होते. 
 
 
 

 
 

loading image