कंगणाचा नादच खुळा; चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

actress Kananga ranaut won the national award for manikarnika and panga
actress Kananga ranaut won the national award for manikarnika and panga

मुंबई - अभिनेत्री कंगणाला भलेही लोकं नावं ठेऊ देत, तिच्य़ावर टीका करु देत मात्र तिच्या अभिनयाला कुठलं चँलेज नसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दुपारी राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली तेव्हा कंगणाच्या नावाचा पुन्हा पुकारा झाला. ती बातमी तिच्यासाठी आनंदाची होती. त्याचे कारण असे की यंदाचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा नॅशनल अॅवॉर्ड कंगणाला जाहीर झाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिला तिच्या मणिकर्णिका आणि पंगा या चित्रपटातील अभिनयामुळे तिच्या नावावर आणखी एक नॅशनल अॅवॉर्ड जमा झाले आहे. कंगणाचे हे चौथे नॅशनल अॅवॉर्ड आहे. यापूर्वी तिला फॅशन, तन्नु वेड्स मन्नु, क्वीन चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला आहे.

सर्वांना उत्सुकता असणा-या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अॅवॉर्डविषयी उलट सुलट चर्चेला तोंड फुटले होते. यंदा ज्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे त्याचे नाव तुम्ही ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. दिवंगत अभिनेता सुशांतसिंगच्या छिछोरे चित्रपटाला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चित्रपटाला कोणते निकष लावून नॅशनल अॅवॉर्ड देण्यात आल्याचा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे.

कंगणाच्या थलाईवा चित्रपटाचा ट्रेलर उद्या 23 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याचदिवशी कंगणाचा वाढदिवसही आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणून कंगणाचे नाव घेता येईल. तिचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. ट्रेलर प्रदर्शित करण्याची माहिती सांगत असताना तिनं तिचे त्या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच आपल्या प्रवासाविषयी काही आठवणीही सांगितल्या आहेत. चाहत्यांनी कंगणावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे.

कंगणानं लिहिलं आहे की, थलाईवीचा ट्रेलर प्रदर्शित व्हायला एक दिवस बाकी आहे. या बायोपिकसाठी कंगणानं तब्बल 20 किलो वजन घटवले आहे. वजन कमी करणे, ते पुन्हा वाढवणे यासाठी कंगमाला मोठं आव्हान पार करावं लागलं. तो प्रवास तिच्यासाठी सोपा नसल्याचे तिनं सांगितलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा 67 वा समारंभ सोमवारी पार पडला. दुपारी चार वाजता हा समारंभ पार पडला. त्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नॉन फिचर फिल्म पुरस्कारांची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यात बेस्ट नॅरेशन - वाईल्ड कर्नाटका, बेस्ट म्युझिक डायरेक्टर - विशाख ज्योती, सविता सिंह यांना सौंसी या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा अॅवॉर्ड मिळाला आहे. तसेच सुधांशु सरिया यांना नॉक, नॉक नॉक चित्रपटासाठी बेस्ट डिरेक्टरचे अॅवॉर्ड मिळाले आहे.

राधा या चित्रपटाला बेस्ट अॅनिमेशन फिल्मसाठी अॅवॉर्ड मिळालं आहे. तर बेस्ट नॉन फिचर फिल्मसाठी - एन इजीनिअर्ड ड्रीमला गौरविण्यात आले आहे. फिचर फिल्मसाठीचे पुरस्कारही यावेळी घोषित करण्यात आले आहेत. त्यात स्पेशल मेशंन - बिरीयानी (मल्याळम), जोनाकी पोरवा (असमिया), लता भगवानकरे आणि पिकासो (मराठी) बेस़्ट फिचर फिल्ममध्ये छोरियां छोरों से कम नहीं (हरियाणवी), भुलन दी मेज (छत्तीसगढी), बेस्ट तेलुगु फिल्म- जर्सी, बेस्ट तमिल फिल्म- असुरन, बेस्ट पंजाबी फिल्म- रब दा रेडियो 2, बेस्ट मलियाली फिल्म- कला  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com