'अली जाफर, है हिम्मत अल्लाह का मज़ाक़ उड़ाने की ?'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित होताच त्यावरुन प्रचंड वाद सुरु झाला. तो काही थांबण्याचे नाव घेत नाही. 

 मुंबई - तांडव मालिका प्रदर्शित झाली त्यानंतर ज्याप्रकारे वादाला सुरुवात झाली तो वाद टोकाला जाऊन पोहचला आहे. गेल्य़ा आठवडाभरापासून त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारे टीका त्या मालिकेवर होऊ लागली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी तांडववर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या आमदार आणि काही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. त्यात आता अभिनेत्री कंगणा राणावतची भर पडली आहे. तिनं तांडवच्या निर्मात्यांना फटकारले आहे.

कलेसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे त्यावर कुठल्याही प्रकारचा दबाब येता कामा नये अशी भूमिका कलाकार घेत असतात. मात्र त्या कलाकृतीतून समाजातील वातावरण दुषित होत असेल तर त्याविषयी कुणी बोलायला मागत नाही हे आतापर्यतच्या अनेक उदाहरणावरुन दिसून आले आहे. निर्माता अली अब्बास जफर निर्मित ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित होताच त्यावरुन प्रचंड वाद सुरु झाला. तो काही थांबण्याचे नाव घेत नाही.  या वेब सीरिची कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या संपूर्ण टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे.  कंगनाने  ट्वीट करुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.

कंगणानं जहरी शब्दांत तांडव निर्मात्यांवर टीका केली आहे ती म्हणाली,  तुमच्यामध्ये अल्लाची टिंगल करण्याची हिंमत नाही का, दरवेळी हिंदू धर्माला धारेवर धरुन त्याची थट्टा केली जाते. हे बरोबर नाही. पुढे ती म्हणाली, आता कळते आहे की, निर्मात्यांनी माफी मागितली आहे मात्र ती  मागण्यासाठी कुठे वाचणार ? हे तर थेट गळाच चिरतात, जिहादी देश फतवाच काढता, लिब्ररल मीडिया वर्च्युअल लॉन्चिंग करते, तुम्हाला केवळ मारलंच जात नाही, तर तुमच्या मृत्यूला जस्टिफायही करण्यात येते. अशावेळी अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का? असे कंगणानं म्हटलं आहे. 

युपीत 'लव जिहाद' चा तमाशा; हिंदू - मुस्लिमांमध्ये दरी वाढविण्याचा प्रयत्न

‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यात मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करताना दाखवले आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. यावेळी तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला होता.  

'कंगणावर चोरीचा आरोप, 1950 च्या अगोदर कसला आला कॉपीराईट'

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे.  याबरोबरच सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब हे कलाकार आहेत.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress kangana ranaut angry on tandav director and producer ali abbas jafar