कंगणानं केलं नथुराम यांचं समर्थन म्हणे, 'आपल्यापासून सत्य लपवलं'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 31 January 2021

 नथुराम गोडसे यांच्याविषयी शेयर केलेल्या एका पोस्टमुळे कंगणा चर्चेत आली आहे.

मुंबई - वादात सापडल्याशिवाय कंगणाला काही चैन पडत नाही. ती सतत वेगवेगळया गोष्टींवर ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यामुळे तिनं अनेकांची नाराजी ओढावून घेतली आहे. यापूर्वी व्टिटरनं देखील तिचं अकाऊंट काही काळासाठी बंद केले होते. कारण तिनं त्यांच्यावर टीका केली होती. आता कंगणानं नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारी पोस्ट लिहिली आहे, त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. आपल्या मतावर ठाम असणारी कंगणानं दिल्लीत शेतक-यांच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेतली होती. त्यावरुन तिनं काही आक्षेपार्ह पोस्ट शेयर केल्या होत्या. यामुळे सहा जाहीरात कंपन्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

कंगणानं नथुराम गोडसे यांच्याविषयी शेयर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. कंगणानं शहीद दिवसाच्या निमित्तान ती पोस्ट शेयर केली आहे. त्यात ती म्हणते, प्रत्येक गोष्टीचे तीन महत्वाचे पैलू असतात. त्या गोष्टीकडे आपण तीन प्रकारे पाहतो. एक माझ्या दृष्टीकोनातून, एक तुमचा आणि एक असते खरी बाजू. जो कोणी चांगली गोष्ट सांगतो तो आपल्यापासून काही लपवत नाही. ना त्याला कसली भीती असते. त्यामुळे आपली सगळी पुस्तके ही काही बेकार आहेत. ती काही कामाची नाहीत. कारण तो सगळा दिखावा आहे. यानंतर तिनं #NathuramGodse चा वापर केला आहे. अशाप्रकारचे व्टिट केल्यानंतर कंगणा चर्चेत आली आहे. त्यावरुन अनेकांनी तिचं कौतूक केलं आहे. तर मोठ्या प्रमाणात ती ट्रोलही झाली आहे.

कंगणाच्या म्हणण्यानुसार आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून जो इतिहास शिकवला जातो त्यात लपवाछपवी असते. आणि त्यामुळे तो पूर्णपणे चूकीचा आहे. अर्थात हे असे काही पहिल्यांदाच होते आहे असं नाही. यापूर्वीही अनेक गोष्टी आपल्यापासून लपविल्या गेल्या आहेत. कंगणाच्या या पोस्टमुळे ती नव्या वादात सापडली आहे. कंगणाला प्रत्येक विषयावर बोलायचे असल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. आपल्या मतांवर ठाम असणारी कंगणा टीकाकारांचा फारसा विचार करत नसल्याचे दिसून आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress kangana ranaut supports Nathuram Godse tweets for him on martyrs day