
कंगणानं शेतक-यांचा अपमान केल्याचे सुखदेव यांनी सांगितले आहे. त्यांनी असा आरोप केला की, पोलिसांनी कॉग्रेसच्या काही कार्यकत्यांना मारहाण केली.
मुंबई - कॉग्रेसच्या एका मंत्र्यांनं बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री कंगणाला धारेवर धरले आहे. त्यांनी तिच्यावर सडकून टीका केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कंगणा गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या रडारवर आहे. तिनं आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीका ओढावून घेतली होती. कंगणा सातत्यानं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिलाही जशास तसे उत्तर देणा-यांची संख्या काही कमी नाही.
कंगणा राणावत ही मध्यप्रदेशात तिच्या धाकड नावाच्या एका चित्रपटाचे शुटिंग करत होती. त्यावेळी अशी माहिती मिळाली की, कॉग्रेसच्या काही मंत्र्यांनी तिला त्या चित्रपटाचे शुटिंग थांबविण्याची धमकी दिली. अन्यथा त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यावेळी कमलनाथ सरकारमधील एक मंत्री सुखदेव पानसे यांनी कंगणाला नाचणारी आणि गाणारी असे म्हटले होते. तसेच कॉग्रेसच्या ज्या कार्यकत्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली त्यांना सोडण्याचे आवाहन केले आहे. कॉग्रेसचे काही कार्यकर्ते हे कंगणाच्या शु़टिंगमध्ये अडथळा आणत होते.
कंगणानं शेतक-यांचा अपमान केल्याचे सुखदेव यांनी सांगितले आहे. त्यांनी असा आरोप केला की, पोलिसांनी कॉग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली. मागील आठवड्यात शेतक-यांनी सांगितले होते की ते कंगणाच्या चित्रपटाला विरोध करणार. त्यानंतर पोलिसांनी कॉग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव पानसे यांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणला. त्यावर सुखदेव यांनी पोलीस हे लोकशाहीच्या विरोधात काम करत असून त्यांनी कंगणाचे बाहुले म्हणून काम करु नये. आता पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हायला हवी. जोपर्यत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यत आमच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही चौकशी होऊ देणार नाही. असे सुखदेव यांनी सांगितले.