कंगणाचा 'देवमाणूस' कोण?; माहितीये?

actress kanganas devta tweeted about director of thalaivi post viral on social media
actress kanganas devta tweeted about director of thalaivi post viral on social media
Updated on

मुंबई - वादग्रस्त असं म्हणवून घेणं कंगणाला आता आवडायला लागले आहे. तिनं बॉलीवूडमधील जवळपास ब-याच प्रमुख सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरही तिला मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे कंगणा दरदिवशी काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. सध्या तिचा आणि तापसीचा वाद सुरु आहे. त्यापूर्वी प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांच्याशी तिनं पंगा घेतला होता. त्यावर जावेद यांनी तिला कोर्टात आव्हान दिलं आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सरकारच्या बाजूनं कंगणानं मांडलेली भुमिका अनेकांच्या रोषाचे कारण ठरल्याचे दिसून आले आहे.आता कंगणा चर्चेत यायचे कारण म्हणजे तिनं तिच्या देवतांविषयी काही खुलासा केला आहे. थोडक्यात अशी माणसे की जी तिला देवासारखी वाटतात. तिच्या या पोस्टलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यात कंगणानं बॉलीवूडपेक्षा टॉलीवूडला दिलेलं महत्व अनेकांच्या नजरेत आले आहे. त्यामुळेही पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात होणार असल्याची कुजबुज सुरु आहे. कंगणा सध्या जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित अशा ‘थलायवी’ चित्रपटामध्ये काम करत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होत आले असून  कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांच्यासाठी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर ती पोस्ट कमालीची लोकप्रिय झाली आहे. कंगणानं त्यात असं म्हटलं आहे की, विजय सर आता थलायवीचं निम्मे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. अजून थोडे बाकी आहे. त्यामुळे हा प्रवास संपत आला असून मी तुम्हाला मिस करत आहे. असे मला वाटत आहे. अशी पोस्ट तिनं शेअर केली आहे. कंगणानं या चित्रपटासाठी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत नेत्या जयललिता यांची भूमिका वठवली आहे. तिने यापूर्वी ट्विट केलं होतं की तिला  ज्येष्ठ जयललिताची भूमिका करण्यासाठी 20 किलो वजन वाढवावे लागले  होते.

 
 कंगणानं सांगितले आहे की,  विजयची मला तुमच्याबद्दल एक अशी गोष्ट लक्षात आली की तुम्ही चहा, कॉफी, वाईन, नॉनव्हेज, पार्टीज या सगळ्यापासून लांब राहता. मला हळूहळू हे कळू लागलं आहे की मी जसंजशी कलाकार म्हणून जास्त प्रकट होऊ लागते, तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक येऊ लागली आहे. मी तुम्हाला कधीच रागावलेलं, अस्वस्थ झालेलं पाहिलं नाही. तुम्ही माणूस नाही तर देवता आहात. मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. मला तुमची आठवण येईल. या शब्दांत कंगणानं आपल्या भावना शब्दबध्द केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com