
अभिनेत्री केतकी चितळेची तुरुंगातून सुटका
मुंबई : काही दिवसांपूर्वी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट करणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळेची गुरुवारी (ता. २३) तुरुंगातून सुटका करण्यात आली केतकी चितळे हिला बुधवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर येताना केतकी हसताना दिसली. (Actress Ketki Chitale released from jail)
मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शरद पवार (sharad pawar) यांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केले होते. तसेच त्यांना भ्रष्ट संबोधले होते. यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर केतकीला १४ मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर १८ मे पासून केतकी न्यायालयीन कोठडीत होती.
हेही वाचा: अजित पवारांना गुजरात, आसाममधील स्थिती माहिती नसेल - पवार
मंगळवारी केतकी चितळेच्या जामीन अर्जाला पोलिस विरोध करीत नसल्याचे सांगत अतिरिक्त जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.
केतकी चितळेवर (Ketki Chitale) झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वकिलांनी राज्यपालांकडे केली होती. पोस्टाद्वारे गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाने सल्ला दिला आहे. याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. आज तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
Web Title: Actress Ketki Chitale Released From Jail
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..