Meenakshi Rathod : मुलीच्या जन्मानंतर गायब झालेली अभिनेत्री पुन्हा शानदार कमबॅक करतेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meenakshi Rathod : मुलीच्या जन्मानंतर गायब झालेली अभिनेत्री पुन्हा शानदार कमबॅक करतेय

Meenakshi Rathod : मुलीच्या जन्मानंतर गायब झालेली अभिनेत्री पुन्हा शानदार कमबॅक करतेय

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीची झालीये. याच मालिकेत काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मीनाक्षी राठोड देवकीची भूमिका साकारायची. प्रेग्नंसी काळात मीनाक्षीने हि मालिका सोडली. आता जवळपास वर्षभरानंतर मीनाक्षी पुन्हा एकदा शानदार कमबॅक करतेय.

(actress meenakshi rathod comback in marathi serial after the birth of her daughter)

हेही वाचा: Miss Universe 2022 : 'बिटकॉईन' चा ड्रेस घालून रँप वॉक, परिक्षकही पाहतच राहिले!

मीनाक्षीने सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत मीनाक्षीच्या हातात एक स्क्रिप्ट दिसत असून मीनाक्षी एका मालिकेच्या सेटवर दिसत आहे. या व्हिडिओखाली मीनाक्षीने 'लो फिर आगये हम, स्वागत नहीं करोगे.(कब कहाँ जल्द ही बतायेंगे)' असं कॅप्शन लिहिलं आहे. अशाप्रकारे मुलीच्या जन्मानंतर मनोरंजन विश्वातून गायब असलेली मीनाक्षी पुन्हा एकदा शानदार कमबॅक करायला सज्ज आहे.

मीनाक्षी ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. त्यातून तीला भरपूर लोकप्रियता मिळाली. मीनाक्षीचा पती कैलास वेगवेगळ्या नाटकांमधून प्रभावीपणे भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकातील भूमिकेचं प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केलंय.

गरोदरपणात मीनाक्षीने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका सोडली होती. तिचे फॅन्स तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. मीनाक्षीला मुलगी झाली तिचं नाव यारा. मुलीसोबत कैलाश आणि मीनाक्षी फोटो आणि व्हिडिओ शूट करत असतात. या फोटो आणि व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळत असते. आता मीनाक्षी नेमक्या कोणत्या प्रोजेक्ट मधून दिसणार याचा उलगडा लवकरच होईल.

हेही वाचा: Adipurush: प्रभासचा 'आदिपुरुष' पुन्हा पोहोचला कोर्टात..प्रमाणपत्राविनाच टीझर रिलीज केल्याचा होतोय आरोप