अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन; वाढदिवस केला आणि तिसऱ्याच दिवशी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress Nishi Singh passes away two days two days after her 50th birthday

अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन; वाढदिवस केला आणि तिसऱ्याच दिवशी..

nishi singh passes away: मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निशी सिंग यांचे निधन झाले आहे. रविवारी 18 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'इश्कबाज' आणि 'कुबूल है' या त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मालिका होत्या. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अत्यंत कमी कालावधीत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. दुर्दैवाने त्यांना आजाराने ग्रासल्याने फरवेळ मनोरंजन विश्वात सक्रिय राहता आले नाही. अखेर रविवारी रात्री त्यांचे दीर्घकाळ आजाराने निधन झाले.

निशी सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गेल्या चार वर्षापासून निशी सिंह अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या निधनानंतर निशी सिंग यांचे पती लेखक-अभिनेता संजय भादली यांनी एका माध्यमाला सांगितले की, 'निशी चार वर्षांपासून आजारी होत्या. 13 फेब्रुवारी 2019 रोजी तिला अर्धांगवायूचा पहिला झटका आला. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा दुसरा झटका आला. त्यानंतर 24 मे 2022 रोजी पुन्हा तिसऱ्यांदा तिला अर्धांगवायु झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते.'

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 16 सप्टेंबर रोजी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी त्यांनी पती संजय यांच्याकडे बेसनाचा लाडू खाण्याची इच्छा व्यक्त केली. संजय यांनीही ती इच्छा पूर्ण केली. गेली काही दिवस घशाच्या संसर्गामुळे त्यांना केवळ द्रव पदार्थ दिले जात होते. वाढदिवासानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. निशी यांनी 8 वर्षे इंडस्ट्रीत काम केले. केवळ मालिकाच नाही तर 'मान्सून वेडिंग' या चित्रपटातही तिने काम केले होते. कमल हसन आणि मामूटी यांच्यासोबतही त्यांनी चित्रपट केला होता. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Web Title: Actress Nishi Singh Passes Away Two Days After Her 50th Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tv Entertainment News