बापरे काय ही फॅशन ? नुसरत भरुचाला नेटकऱ्यांचा सवाल

Actress Nushrat bharucha trolled for her hot dress
Actress Nushrat bharucha trolled for her hot dress
Updated on

मुंबई : सेलिब्रिटींच्या फॅशनची चर्चा तर सुरुच असते. अभिनेत्री आणि अभिनेतेही त्यांच्या अतरंगी फॅशनमुळे नजरेत येतात. कधी कोण कसली फॅशन करेल याचा काही नेम नाही. नुसरत जहां हिचं नाव आता घराघरात पोहोचलं आहे. आपल्या सुंदरतेने चाहत्यांना घायळ करणारी नुसरत हिच्यावर ट्रोलर्संनी निशाणा साधला आहे. जाणून घ्या नक्की ती का ट्रोल होत आहे. 

प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी, ड्रिमगर्ल हे काही मोजकेच पण सुपरहिट सिनेमे करुन नुसरतने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीवर लोकांची आणि पॅपराझींची नजर असते. सेलिब्रिटींचे अवॉड शोचे लुक्स, एअपरपोर्ट लुक नेहमीच व्हायरल होत असतात. नुकताच रविवारी मुंबईमध्ये 'फिल्मफेअर अवॉर्ड 2020' हा पार पडला. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आला उपस्थिती लावली.

याच अवॉर्ड शोला नुसरतही आली होती. पण, तिने घातलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळी नुसरतने घातेलला ड्रेस हा अतिशय बोल्ड आहे. तिने हा ड्रेस घातलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा बोल्ड लुक काही भोवला नसल्य़ाचं दिसतं. कारण, नेटकऱ्यांनी तिच्या या लुकमुळे तिला ट्रोल केलं आहे. 

मोरपिसी रंगाचा हा ड्रेस ऑफशोल्डर आणि एका बाजूने स्लिटचा आहे. मात्र या स्लिटमुळे संपूर्ण एक बाजू दिसते आहे. याचमुळे नुसरत ट्रोल होताना दिसतेय. एवढचं काय तिचा टॅटूही दिसतो आहे. काही सेलिब्रिटींनी तिच्या बोल्ड लुकचं कौतुक केलं आहे तर, अनेकांनी अशी कोणती फॅशन असा सवाल केला आहे. 'फॅशन डिझायनर कुठे कात्री लावतील याचा नेम नाही', 'हिचा ड्रेस पाहून देशात गरीबी आहे असं वाटतं' अशाप्रकारच्या कमेंट काही युजरने केल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच देसी गर्ल प्रियांका चोप्राही तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली होती. नुसरतचा आयुष्मान खुरानासोबतचा 'ड्रिमगर्ल' नुकताच रिलिज झाला. तर, राजकुमार राव सोबतचा 'छलांग' हा सिनेमा लवकरच रिलिज होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com