esakal | 'आठ वेळा कानाखाली मारलं राव, अशी कशी जाहिरात ? '
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Pooja Bedi horrified Sanjana Sanghis latest lionsgate play

अभिनेत्री पूजा बेदी ही तिच्या आक्रमक वक्तव्यासाठी प्रसिध्द आहे. आताही तिनं एका जाहिरातीत दाखविण्यात आलेल्या आशयावर टीका केली आहे.

'आठ वेळा कानाखाली मारलं राव, अशी कशी जाहिरात ? '

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - एकीकडे जाहिरांतीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांना दिले जाणारं झुकते माप , त्याशिवाय त्या जाहिरातीतून महिलांवर केली जाणारी शेलकी टिप्पणी यामुळे त्या जाहिरातीवर टीका केली जाते. आता अशाच एका जाहिरातीवर महिला अभिनेत्रीनं परखड मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे सबंधित जाहिरातीमध्ये महिलेवर नव्हे तर पुरुषाचे चित्रण योग्य पध्दतीनं झालं नसल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री पूजा बेदी ही तिच्या आक्रमक वक्तव्यासाठी प्रसिध्द आहे. आताही तिनं एका जाहिरातीत दाखविण्यात आलेल्या आशयावर टीका केली आहे. त्याविषयी ती म्हणाली, पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही. लायन्सगेट प्ले शोची एक जाहिरात सोशल मीडिया आणि टीव्हीवर व्हायरल झाली आहे. त्यात दाखविण्यात आलेल्या कंटेटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या जाहिरातीमध्ये अभिनेत्री संजना ही  एका मुलाला आठ वेळा कानाखाली मारताना दिसत आहे. अशाप्रकारच्या जाहिरातीमधून नेमकं काय दाखवायचे आहे, असा प्रश्न नेटक-य़ांनी विचारला आहे. त्यावर अभिनेत्री पूजा बेदीनं कडक भूमिका घेतली आहे. .याप्रकारच्या जाहिरातीतून  पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही असे म्हटले आहे.

ज्यावेळी मी ही जाहिरात पाहिली त्यावेळी त्यातून नेमकं काय दाखवायचे आहे हे काही समजले नाही. जे पाहिले त्यामुळे नवलही वाटले. अशाप्रकारे जर  पुरुषांवर घरगुती हिंसाचार होत असेल तर तो सहन केला जाणार नाही. ते सांगायला हवे. आता आपण त्या जाहिरातीमध्ये जे पाहिले तेच चित्र उलटे केले तर सहन होईल का, असा प्रश्न पूजानं विचारला आहे. पूजानं व्टिटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्याला नेटक-यांनी प्रतिसादही दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ या चित्रपटात संजनानं काम केलं होत. त्यानंतर आता ती या जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.  या जाहिरातीवर अभिनेत्री पूजा बेदीने कडाडून टीका केली आहे.