
काही करुन चर्चेत राहण्यासाठी प्रियंका वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीक वापरत असते.
मुंबई - वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करुन चर्चेत राहण्याची अभिनेत्रींची सवय जुनीच आहे. मात्र फॅशन किती हटक्या पध्दतीची असु शकते हे अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या आताच्या ड्रेसवरुन दिसून आले आहे. तिचा एक वेगळा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिनचं तो केला आहे. मात्र त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. यापूर्वीही प्रियंकानं हटके लूक करुन चाहत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
काही करुन चर्चेत राहण्यासाठी प्रियंका वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीक वापरत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिचे आत्मचरित्र प्रसिध्द झाले होते. त्यातील एक प्रकरण सध्या ती सोशल मीडियावर शेअर करुन अनेक धक्कादायक खुलासे करत असल्याचे दिसुन आले आहे. आता तिनं एक अजबच वेशभुषा केली आहे. त्यामुळे तिला नेटक-यांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं आहे. त्याचा कुठलाही परिणाम प्रियंकावर झालेला नाही. तिनं आपल्यावर टीका करणा-यांचे आभार मानले आहे.
Too funny... Thanks for making my day guys ! @LUXURYLAW #halpernstudio pic.twitter.com/TpEJIUocSJ
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
परफेक्शन आणि पर्सनॅलिटी यासाठी बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये प्रियंकाची ओळख आहे. तिचा फॅशन सेन्स बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सरस असल्याचे दिसून आले आहे. स्टाइल आयकॉन म्हणून प्रसिध्द असणा-या प्रियंकाचा एक हटके लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटक-यांनी प्रियंकाच्या त्या पोस्टवर मीम्स टाकून तिला ट्रोल केले आहे. तिनं एक ग्रीन कलर चा बॉल टाईप ड्रेस परिधान केला आहे. त्यावर ब्लॅक कलरचे स्टॉकिंग्सही घातले आहेत. त्यामुळे प्रियंका ही एका चेंडूवर पडल्याचे वाटत आहे.
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
प्रिय़ंकाचा हा फोटो सर्वांच्या चेष्टेचा विषय ठरत आहे. मात्र आपल्य़ावर झालेल्या टीकेचा प्रियंकानं खुल्या मनानं स्वागत केलं आहे. तिनं नेटक-यांना धन्यवाद दिले आहे. माझा दिवस आनंददायी केल्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे. अशी प्रतिक्रिया प्रियंकानं दिली आहे. प्रियंकाचे अनफिनिश्ड नावाचे आत्मचरित्र प्रसिध्द झाले आहे. त्यात तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. तसेच ती व्हाईट टायगर नावाच्या चित्रपटातही दिसली होती.