'स्लिम दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्स, मलाही हाच सल्ला दिला होता' राखी सावंत बरळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant

राखीचं म्हणणं आहे की 'अभिनेत्री स्लिम राहण्यासाठी ड्रग्स घेतात जेणेकरुन त्यांना भूक लागू नये. यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात' असं राखी म्हणाली आहे.

'स्लिम दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्स, मलाही हाच सल्ला दिला होता' राखी सावंत बरळली

मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग प्रकरण गाजतंय. बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी आत्तापर्यंत यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यातंच आता राखी सावंतने या मुद्द्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. राखीचं म्हणणं आहे की 'अभिनेत्री स्लिम राहण्यासाठी ड्रग्स घेतात जेणेकरुन त्यांना भूक लागू नये. यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात' असं राखी म्हणाली आहे.

हे ही वाचा: शाहरुखची लेक सुहानाने शेअर केली एक अजब पोस्ट, ड्रग चॅट प्रकरणावर होता सुहानाचा रोष?  

राखी सावंतने नुकत्याच एका मुलाखतीत ड्रग्स संबंधी इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या घडामोडींविषयी चर्चा केली आहे. राखी म्हणाली, 'मी गेल्या १५ वर्षांपासून या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. कित्येक जण मग ते हिरो असो की हिरोईन ड्रग्स घेतात. ते स्वतःचं ग्लॅमर टिकवण्यासाठी असं करतात. काहीजण नशेसाठी ड्रग्स घेतात मात्र जास्तकरुन ग्लॅमर टिकून राहण्यासाठी नशा करतात. अभिनेते जास्तकरुन वीडचं सेवन करतात ज्यामुळे त्यांना भूक लागत नाही. मुली स्वतःला स्लिम ट्रीम ठेवण्यासाठी असं करतात जेणेकरुन त्या कॅमेरासमोर बारीक दिसतील. अभिनेत्रींवर त्यांच्या वजनावरुन जास्त दबाव असतो. त्यांना भिती असते की जर त्यांंचं वजन वाढलं तर त्यांना सिनेमात काम मिळणं बंद होईल.'

इतकंच नाही तर यात राखीने स्वतःचा अनुभव देखील शेअर केला. 'मी देखील काही वर्षांपूर्वी माझ्या वजनामुळे हैराण होती. तेव्हा मला देखील वीड आणि हॅश घेण्याचा सल्ला दिला होता. मला सांगितलं गेलं की हे खूपंच सामान्य आहे. अनेकजण स्लिम राहण्यासाठी ड्रग्स घेतात. मात्र मी त्या सल्ल्याशी सहमत नव्हती. ड्रग्स ऐवजी मी योगाची निवड केली. कित्येक सेलिब्रिटी आहेत ज्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही ते अशा शॉर्ट कट्सचा वापर करतात जो चुकीचा आहे.'

राखी पुढे म्हणाली की, 'इंडस्ट्रीमध्ये कोण कोण ड्रग्स घेतं याची मला कल्पना आहे मात्र त्यांचं नाव घेण्याचा मला अधिकार नाही. मला हे समजत नाही की लोक केवळ बॉलीवूडलाच गटार का म्हणतात? आपण ही गोष्ट स्विकारली पाहिजे की ड्रग्सचं सेवन संपूर्ण जगभरात केलं जातं. असं असून देखील बॉलीवूडला टारगेट केलं जातंय.'  

actress rakhi sawant revealed that actor take drugs for maintain their weight  

loading image
go to top