अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 'पार्क अॅम्बेसिडर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑगस्ट 2018 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राजदूत होण्याची रविना टंडन यांना पत्रान्वये विनंती केली होती.

मुंबई : अभिनेत्री रविना टंडनने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 'उद्यान राजदूत आणि पार्क अॅम्बेसिडर' म्हणून काम स्वीकारले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑगस्ट 2018 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राजदूत होण्याची रविना टंडन यांना पत्रान्वये विनंती केली होती. काल (ता. 22) मुनगंटीवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 274 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात. प्राण्यांच्या 35 आणि वृक्षांच्या 1100 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. उद्यानात सिंह आणि व्याघ्र सफारीमुळे पर्यटकांचे हे विशेष आकर्षण आहे. 

वनमंत्री मुनगंटीवार यांनी लिहीलेल्या पत्रात त्यांनी 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पुर्ण झाल्याचे सांगून संकल्प काळात राज्यात लोकसहभागातून 15 कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाल्याचे नमूद केले होते.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Raveena Tandon is ambassador of Sanjay Gandhi National Park