esakal | रियाला तुरुंगात दिले जातेय ‘हे’ जेवण; याशिवाय ‘या’ आहेत सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Riya Chakraborty is given the same meal as other inmates in the jail

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन घडामोडी होत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्जचा मुद्दा समोर आला.

रियाला तुरुंगात दिले जातेय ‘हे’ जेवण; याशिवाय ‘या’ आहेत सुविधा

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन घडामोडी होत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्जचा मुद्दा समोर आला. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. पण तुरुंगात असलेल्या रिया कशी राहत असले, तिला जेवण काय दिले जात असेल, तिची व्यवस्था कशी असेल असे अनेकांना प्रश्‍न पडला असेल.

रियाला तुरुंगात एक चादर, बेडशीट, उशी आणि चटई देण्यात आली आहे. तसंच गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी तिला एक मोठी पिशवीदेखील देण्यात आली आहे. इतर कैद्यांप्रमाणेच रियाला जेवण देण्यात येत आहे. या जेवणामध्ये दोन पोळ्या (चपाती), एक वाटी भात, एक वाटी वरण (डाळ) आणि एक भाजी यांचा समावेश आहे. 

ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली तिला अटक झाली. तिची रवानगी तुरुंगात झाली आहे. तुरुंगात गेल्यानंतरही तिच्याविषयीची चर्चा थांबलेली नाही. पहिल्या दिवशी तुरुंगात तिला कोणतं जेवण देण्यात आलं याचे वृत्त एका दैनिकात देण्यात आले होते. ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांखाली अटक झालेल्या रियाची भायखळा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याच कारागृहात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील आहे. तसंच या तुरुंगात सहा बॅरेक असून प्रत्येक बॅरेकमध्ये जवळपास ४० ते ५० संशयित आरोपी असतात. येथेच रियादेखील राहत आहे.

दरम्यान, तुरुंगामध्ये कैद्यांसाठी उपहारगृहदेखील आहे. यामध्ये बिस्कीट्स किंवा अन्य खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. तसंच सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे कलाविश्वातदेखील खळबळ उडाली आहे. यात अनेक कलाकारांनी रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. तर काही कलाकारांनी सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.